---Advertisement---

लॉकडाऊनचा परिणाम; या क्रिकेटपटूने चक्क त्याच्या पत्नीकडून कापून घेतले आपले केस

On: रविवार, एप्रिल 12, 2020 1:54 PM
---Advertisement---

भारतात कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे खेळाडूंना आपल्या घरातच वेळ घालवावा लागत आहे. लहान-मोठे कामही खेळाडूंना आपापल्या घरी राहूनच स्वत:ला करावे लागत आहेत. भारतीय संघाचा डावखुरा फलंदाज सुरेश रैनाही दिल्लीतील आपल्या घरात राहून लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहे.

अशामध्ये आता रैनाचे केस खूप वाढले आहेत. परंतु लॉकडाऊन असल्यामुळे केस कापण्यासाठी बाहेर जाण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्याचे केस कापण्यासाठी त्याला मदतीची आवश्यकता आहे. तर यामध्ये त्याच्या मदतीसाठी त्याची पत्नी प्रियंका (Priyanka Raina) पुढे आली आहे.

रैनाने (Suresh Raina) सोशल मीडियावर आपल्या नवीन हेअरस्टाईलचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने सांगितले की, या कार्यात त्याला त्याच्या पत्नीने मदत केली आहे.

आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रैनाने फोटो शेअर करत लिहिले की, “मी जास्त वाट पाहू शकत नाही. मला मदत केल्यामुळे धन्यवाद प्रियंका.”

यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचाही (Virat Kohli)  एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ज्यामध्ये त्याची पत्नी व अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma) त्याचे केस कापत होती. केविन पीटरसन बरोबर इंस्टाग्रामवरील लाईव्ह व्हिडिओदरम्यान त्याने सांगितले होते की, अनुष्काने खूप चांगल्याप्रकारे केस कापले आहेत.

https://twitter.com/AnushkaSharma/status/1243765087342477318

यानंतर फुटबॉल जगतातील दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोही (Cristiano Ronaldo) असंच काहीतरी करताना दिसला होता. त्याची गर्लफ्रेंड जॉर्जिनाने (Georgina) त्याचे केस कापून त्याला नवीन हेअरकट (New Haircut) दिला होता.

ट्रेंडिंग घडामोडी-

-ब्रायन लारा नाॅटआऊट ४००

-माजी क्रिकेटपटू म्हणतोय, पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे

-मुंबई क्रिकेटचे प्रशिक्षकपद सांभाळायला आवडेल पण काही अटींवर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---