ज्या मैदानावर युवराजने मारले षटकार, ते झालंय आता थेट जेल

भारतीय संघाचे महान क्रिकेटपटू कपिल देव, युवराज सिंग आणि हरभजन सिंग यांच्या घरच्या मैदानाचे रुपांतर मंगळवारी (२४ मार्च) कारागृहात झाले.

कोरोना व्हायरसच्या (Corona Virus) वाढत्या प्रादुर्भावामुळे पंजाबमध्ये लावण्यात आलेल्या कर्फ्यूचे उल्लंघन करणाऱ्या लोकांना ताब्यात घेत आहे. त्याचबरोबर पंजाब सरकार या लोकांना चंदीगड शहरातील सेक्टर- १६ मधील चंदीगड क्रिकेट स्टेडिअममध्ये (Chandigarh Cricket Stadium) ठेवत आहे.

पंजाब आणि हरियाणा संघाचे देशांतर्गत सामने या मैदानावर होतात. तर चंदीगडचाही एक संघ तयार झाला आहे. हे तिन्ही संघ आपले देशांतर्गत सामने याच मैदानावर खेळतात.

असे म्हटले जाऊ शकते की, कपिल देव (Kapil Dev) यांनी आपली घातक स्विंग गोलंदाजी याच मैदानावर शिकली होती. त्याचबरोबर कपिल आणि युवराज सिंगच्या (Yuvraj Singh) चौकार-षटकारांच्या मागे या मैदानाचे मोठे योगदान राहिले आहे. तर हरभजनच्या (Harbhajan Singh) फिरकी गोलंदाजीलाही याच मैदानावर वाव मिळाला आहे.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, “पंजाब सरकार (Punjab Government) सेक्टर- १६ मधील क्रिकेट स्टेडियम आणि मनिमाजरा येथील क्रीडा संकुलाचे तात्पुरते रुपांतर कारागृहात केले आहे. जे कर्फ्यूच्या आदेशांचे उल्लंघन करतील त्या व्यक्तींना येथे ठेवले जाईल.”

या स्टेडियमची क्षमता २० हजारपेक्षा अधिक आहे. हे स्टेडियम १५.३२ एकरमध्ये पसरलेले आहे.

पंजाबमध्ये आतापर्यंत कोविड- १९ व्हायरसची ७ प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे पंजाबचे गव्हर्नर आणि चंदीगडचे प्रशासक व्ही. पी. सिंग बदनोर यांनी सोमवारी मध्यरात्रीपासूनच शहरात खबरदारीचा उपाय म्हणून कर्फ्यू लावला. यावेळी पोलिसांनी सांगितले की, ते कर्फ्यूचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कलम १८८ नुसार एफआयआर दाखल करण्यात येईल.

ट्रेंडिंग घडामोडी-

-मदतीत मुंबईकर पुढे: मुंबई क्रिकेट संघटनेची मु्ख्यमंत्री रिलीफ फंडाला मदत

-मानाच्या रणजी ट्राॅफी स्पर्धेत सर्वाधिक द्विशतके करणारे ३ खेळाडू

-डिजे ब्राव्होनंतर गाण्यानंतर क्रिकेटर ड्वेन ब्रावोचे कोरोनावर नवे कोरे गाणे

You might also like