भारतीय क्रिकेटमध्ये 3 जून हा दिवस खास आहे. कारण भारताचे दोन माजी कर्णधार याच दिवशी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळले. हे दोन दिग्गज म्हणजे मोहम्मद अजहरुद्दीन आणि अजय जडेजा. आजच्याच तारखेला या दोघांना आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळावा लागला. या दोघांच्या कारकिर्दीत अचानकपणे घडलेली एक मोठी घडामोड यासाठी कारणीभूत ठरली.
आशिया चषक 2000मध्ये मोहम्मद अजहरुद्दीन (Mohammad Azharuddin) आणि अजय जडेजा (Ajay Jadeja) यांना पाकिस्तानविरुद्ध आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला. या सामन्यात पाकिस्तानकडून भारतीय संघाला 44 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. हा सामना संपल्यानंतर सुमारे सहा महिन्यांनंतर दक्षिण आफ्रिका संघाचा माजी कर्णदार हँसी क्रोन्ये याने मॅच फिक्सिंगविषयी काही खुलासे केले, ज्यात अजहरुद्दीन आणि जडेजा यांची नावे पुढे आली. या दोघांचे हे प्रकरण समोर आल्यानंतर बीसीसीआयने मोठी कारवाई केली आणि हे दोन्ही खेळाडू पुन्हा कधीच भारतासाठी खेळताना दिसले नाहीत.
संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन याच्यावर बीसीसीआयने मॅच फिक्सिंग प्रकरणात अजीवन बंदी घातली. तर दुसरीकडे जडेजावर क्रिकेटच्या सर्व प्रकारांमध्ये 5 वर्षांची बंदी घातली गेली होती. आशिया चषक 2000 मधील पाकिस्तानविरुद्धचा हा सामना अजहरुद्दीन आणि जडेजासाठी आपला शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना ठरला. दरम्यान, उभय संघांतील या सामन्यात पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांमध्ये 7 विकेट्सच्या नुकसानावर 295 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ 251 धावांपर्यंतच मजल मारू शकला. अजहरुद्दीनने 1, तर जडेजाने 93 धावांची खेळी केली होती.
वादळी फलंदाज म्हणून अजय जडेजांची ओळख
अजय जडेजा मैदानातील आपल्या धमाकेदार फलंदाजीसाठी ओळखला जात असायचा. आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याने 15 कसोटी सामन्यांमध्ये 4 शतकांच्या मदतीने 576 धावा केल्या. वनडे क्रिकेटमध्ये त्याने 196 सामन्यांमध्ये 5359 धावा केल्या आहेत. यात 6 शतके आणि 30 अर्धशतकांचा समावेश आहे. 1996 विश्वचषकात त्याने पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज वकार यूनिसची केलेली धुलाई आजही अनेकांच्या लक्षात आहे. षटकाती 6 चेंडूंमध्ये जडेजाने यूनिसला 22 धावा कुटल्या होत्या. या डावात त्याच्या बॅटमधून 25 चेंडूत 45 धावा आल्या होत्या.
मोहम्मद अजहरुद्दीनचे दर्जेदार शॉट्स
भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन नेहमीच दर्जेदार शॉट्स खेळण्यासाठी ओळखला जात. चाहते आजही त्याच्या फ्लिप शॉटची आठवण काठताना दिसतात. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत अजहरुद्दीनने 99 कसोटी सामन्यांमध्ये 6215 धावा केल्या आहेत. यात त्याने 22 शतके आणि 21 अर्धशतके केली आहेत. वनडेत त्याने 334 सामन्यांमध्ये 9378 धावा केल्या आहेत. वनडे क्रिकेटमध्ये अजहरुद्दीनच्या नावावर 7 शतक आणि 58 अर्धशतक आहेत. कोलकता शहरात 1985 साली अजहरुद्दीनने इंग्लंडविरुद्ध कसोटी खेळून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या मालिकेत त्याने सलग तीन शतके ठोकली होती. आजही हा विक्रम अबाधित आहे.
(The story of Mohammad Azharuddin and Ajay Jadeja’s last international match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
अत्यंत धक्कादायक! चेन्नईने ट्रॉफी जिंकताच त्याने स्वतःवर गोळी झाडून घेतली, महाराष्ट्रातील भयंकर घटना
‘…तिथे त्याची खूप पूजा केली जाते’, डेवॉन कॉनवेकडून धोनीवर कौतुकाचा पाऊस