भारतीय संघ २०१८-१९ दरम्यान ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर होता. या दौऱ्यात ४ सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताने ऑस्ट्रेलिया संघाला २-१ने पराभूत केले होते. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात कसोटी मालिकेत पराभूत करणारा भारत हा पहिलाच आशियाई देश बनला होता.
या मालिकेचा भाग असणारा ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज मार्कस हॅरिसने (Marcus Harris) आपले मत मांडले आहे. हॅरिस यावेळी म्हणाला की, भारतीय संघाची ताकद असणारे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), इशांत शर्मा (Ishant Sharma) आणि मोहम्मद शमीच्या (Ishant Sharma) गोलंदाजीने त्यावेळी तो खूप घाबरला होता.
नुकतीच अमेझॉनवर ऑस्ट्रेलियन क्रिकेटवरील डॉक्यूमेंट्री-सीरिज ‘द टेस्ट’ (The Test) रिलीझ झाली. यामध्ये हॅरिसने सांगितले की, पहिल्या कसोटी सामन्यात पराभव मिळाल्यानंतर कशाप्रकारे त्यांचा संघ दुसऱ्या सामन्यात दबावात होता.
“पर्थच्या खेळपट्टीवर 2018मध्ये भारताच्या वेगवान गोलंदाजांचा सामना करताना मी घाबरलो होतो. दूरवरून पाहताना हे नक्कीच चांगले वाटत असेल. परंतु खेळपट्टीवर गोलंदाजांचा सामना करणे खूप भयावह होते,” असे भारतीय गोलंदाजांबद्दल बोलताना हॅरिस म्हणाला.
तसेच पर्थ (Perth) येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर १४६ धावांनी विजय मिळवला. तसेच मालिकेत १-१ने बरोबरी करण्यात यशस्वी झाला होता.
यानंतर मेलबर्न (Melbourne) येथे २०१८-१९मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (Australia vs India) तिसरा कसोटी सामना जिंकून मालिकेत २-१ने आघाडी घेतली होती.
सिडनीमध्ये (Sydney) खेळण्यात आलेल्या शेवटचा कसोटी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला.
ट्रेंडिंग घडामोडी-
-तुझ्यासारख्या लोकांसाठी ट्विटर बनवलं नाही, ट्विटरऐवजी दुसरं काहीतरी बघ
-जगातील श्रीमंत क्रिकेट लीगमधून डेविड वाॅर्नर बाहेर
-राॅस टेलर- मॅक्क्युलम या २०१२ क्रिकेट वादावर मॅक्क्युलमने प्रथमच केला मोठा खुलासा