इंडियन प्रीमियर लीग स्पर्धेच्या २१ व्या सामन्यात पुन्हा एकदा पंजाब किंग्ज संघातील खेळाडूंकडून निराशाजनक कामगिरी केल्याचे पाहायला मिळाले आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात पंजाब संघाचा ५ गडी राखून पराभव झाला. तसेच या सामन्यात पहिल्या डावातील शेवटच्या षटकात पंजाब संघातील फलंदाज आणि कोलकाता संघातील गोलंदाजामध्ये बाचाबाची झाल्याचे दिसून आले होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत.
तर झाले असे की, कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून शेवटचं षटक टाकण्यासाठी प्रसिद्ध कृष्णा गोलंदाजीसाठी आला होता. या सामन्यात त्याने ३ गडी बाद केले होते. तसेच शेवटच्या षटकातील पहिल्या ३ चेंडूवर फलंदाजी करत असलेल्या क्रिस जॉर्डनने २ षटकार लगावले होते.
यावर प्रत्त्युत्तर म्हणून चौथ्या चेंडूवर प्रसिद्ध कृष्णाने स्लोवर चेंडू टाकला. या चेंडूवर देखील जॉर्डनने षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु हा प्रयत्न फसला आणि त्याची दांडी गुल झाली होती. तो बाद झाल्यानंतर प्रसिद्ध कृष्णाने त्याला काहीतरी म्हटले होते. त्यावर जॉर्डनने देखील प्रत्त्युत्तर दिले होते. अशाप्रकारे ही शाब्दिक बाचाबाची वाढतच चालली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत. तसेच चाहते आपल्या प्रतिक्रिया देखील नोंदवत आहेत.
https://twitter.com/lodulalit001/status/1386708307109322756?s=20
या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. तसेच प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघाकडून मयंक अगरवाल याने ३१ धावा केल्या तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर पंजाब संघाने २० षटक अखेर १२३ धावा केल्या होत्या.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता संघाकडून राहुल त्रिपाठीने ४१ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. तसेच कर्णधार ओएन मॉर्गनने देखील ४७ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर कोलकाता संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच कोलकाता संघाने गुणतालिकेत ४ गुणांसह ५ वे स्थान पटकावले आहे तर, पंजाब संघदेखील ४ गुणांसह ६ व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
काय डोकं लावलंय! यष्टीरक्षकाचं लक्ष विचलित करण्यासाठी फलंदाजाने नकळत फेकली बॅट अन् वाचवली विकेट
नव्या वादाला आमंत्रण! भर सामन्यात डगआऊटमधून मॉर्गनला इशारा, कोडवर्डमध्ये दिले गेले सल्ले