सोमवारी (२६ एप्रिल) पार पडलेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि पंजाब किंग्ज हे संघ आमने सामने होते. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. पंजाब संघातील फलंदाज या सामन्यात देखील मोठ्या धावा करण्यास अपयशी ठरले. तसेच याच सामन्यात कोलकाता संघाची गोलंदाजी सुरू असताना असा काही प्रकार घडला, ज्यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. यासोबतच हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
या सामन्यात कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघातील फलंदाजांना काही सुर गवसला नाही. २० षटक अखेर पंजाब संघाने ९ बाद अवघ्या १२३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करत असताना कोलकाता संघाच्या फलंदाजांनी २० चेंडू शिल्लक असताना ५ गडी राखून हा सामना आपल्या नावावर केला.
तर झाले असे की,पंजाब संघाची फलंदाजी सुरू असताना कोलकाता संघाकडून प्रसिद्ध कृष्णा १० वे षटक टाकत होता. याच षटकातील ५ व्या चेंडूवर डगआऊट मधून मॉर्गनला काहीतरी इशारा करण्यात आला होता, ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. डगआऊटमधून त्याला ५ आणि ४ असा काहीतरी अंक दाखवण्यात आला होता. हे कशासाठी होते याबाबत अजून कुठलाही खुलासा करण्यात आला नाहीये. परंतु हे कृत्य नवीन वादाला आमंत्रण असू शकते. यापूर्वी देखील मॉर्गन ड्रेसिंग रूममधून इशारा करण्याच्या वादात अडकला होता.
https://twitter.com/CricketUnlimi/status/1386700004744523781?s=20
गुणतालिकेत झाले हे बदल
या सामन्यात पंजाब संघाकडून मयंक अगरवाल याने ३१ धावा केल्या तर ख्रिस जॉर्डनने ३० धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर पंजाब संघाने २० षटक अखेर १२३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता संघाकडून राहुल त्रिपाठीने ४१ धावांची उल्लेखनीय खेळी केली होती. तसेच कर्णधार ओएन मॉर्गनने देखील ४७ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर कोलकाता संघाने ५ गडी राखून विजय मिळवला. या विजयासोबतच कोलकाता संघाने ४ गुणांसह गुणतालिकेत ५ वे स्थान पटकावले आहे तर, पंजाब संघ देखील ४ गुणांसह ६ व्या क्रमांकावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-