भारतीय क्रिकेट संघासाठी एक चांगली बातमी समोर येत आहे. मोठ्या काळानंतर भारतीय संघाचे स्टार फलंदाज केएल राहुल आणि श्रेयस अय्यर बेंगलोरच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फलंदाजी करताना दिसले आहेत. असे असले तरी, हे दोन्ही फलंदाज आयर्लंड दौऱ्यात खेळू शकणार नाहीत. मात्र, आगामी आशिया चषकात दोघांचे संघात पुनरागमन होऊ शकते.
माध्यमांतील वृत्तांनुसार आशिया चषक 2023 मध्ये श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) आणि केएल राहुल (KL Rahul) यांना भारतीय संघात सामील केले जाऊ शकते. हे दोन्ही फलंदाज भारतीय संघाचा महत्वाचा भाग आहेत आणि आगामी वनडे विश्वचषक स्पर्धेत संघासाठी निर्णायक खेळी करू शकतात. परंतु यावर्षी दोघांनाही खेळताना दुखापत झाली, ज्यानंतर दोघांवर विदेशात शस्त्रक्रिया देखील करावी लागली. राहुल आणि अय्यर मागच्या काही दिवसांपासून बेंगलोर स्थित राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये फिटनेसवर काम करत आहेत. रविवारी (13 ऑगस्ट) त्यांचा नेट्समध्ये फलंदाजी करतानाचा व्हिडिओ समोर आला, जो चांगलाच व्हायरल होत आहे.
दरम्यान, आगामी आशिया चषक स्पर्धा 30 ऑगस्ट रोजी सुरू होत आहे. या स्पर्धेसाठी राहुल आणि अय्यर पूर्ण फिटनेस मिळवून खेळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या काही दिवसांमध्ये एनसीएमध्ये या दोघांची फिटनेस चाचणी घेतली जाऊ शकते. या चाचणीत जर फलंदाज पास झाले, तर आशिया चषकासाठी यांची थेट संघात निवड केली जाऊ शकते. माध्यमांतील वृत्तांनुसार राहुल आणि अय्यरचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आनुभव पाहता त्यांना थेट प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देखील मिळू शकते.
दरम्यान, राहुलने आपला शेवटचा सामना इंडियन प्रीमियर लीग 2023मध्ये खेळला होता. तर दुसरीकडे अय्यर ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायेदेशातील कसोटी मालिकेदरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. या दोघांव्यतिरिक्त वेगवान गोलंदजा जसप्रीत बुमराह आणि प्रसिद्ध कृष्ण हेदेखील मोठ्या काळापासून एनसीएमध्ये फिटनेस मिळवण्याचा प्रयत्न करत होते. आगामी आयर्लंड दौऱ्यात खेळताना दिसणार आहेत. आगामी आशिया चषकासाठीही या दोघांचे संघाती स्थान जवळपास निश्चित मानले जात आहे. (The video of KL Rahul and Shreyas Iyer’s batting has gone viral, know when they will make a comeback in the team)
महत्वाच्या बातम्या –
निर्णायक सामन्यात हार्दिकने जिंकली नाणेफेक, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारताचा फलंदाजीचा निर्णय
विश्वचषकासाठी वनडे निवृत्तीतून माघार घेणार बेन स्टोक्स? लवकरच होणार संघाची घोषणा