---Advertisement---

तो स्क्रिनशाॅट पाहिल्यावर नक्की काय करावे सुचत नव्हते- राशिद खान

On: मंगळवार, मे 29, 2018 12:58 PM
---Advertisement---

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकने २५मे रोजी राशिद खानला खास ट्विट करुन तो जगातील सर्वोत्तम टी२० गोलंदाज असल्याचे म्हटले होते. याच ट्विटवर रिप्लाय करायला मी जवळपास दोन तास वेळ घेतल्याचे राशिद खान म्हणाला आहे.

क्वाॅलिफायर२ मध्ये कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैद्रबाद सामन्यानंतर राशिद खानच कौतुक करणारा ट्विट सचिनने केला होता. यावेळी तो बसमधुन हाॅटेलला जात होता.

“मला माझ्या मित्राने सचिनच्या ट्विटचा स्क्रिनशाॅट पाठवला. तेव्हा मी बसमध्ये होतो. मी आश्चर्यचकित झालो. मी जवळपास १-२ तास विचार केला की नक्की काय रिप्लाय करु.मला काय लिहावे कळत नव्हते. शेवटी मी रिप्लाय केला.” असे राशिद म्हणाला.

“संपुर्ण अफगाणिस्तानने तो ट्विट पाहिला असेल. सचिन अफगाणिस्तानमध्ये खुप प्रसिद्ध आहे. त्यामुळे सगळेच आश्चर्यचकित झाले होते की माझी सचिनने स्तुती केली. अशा ट्विटमुळे माझ्यासारख्या तरुण खेळाडूंना खुप प्रेरणा मिळते.” असेेही तो पुढे म्हणाला.

काय केला होता सचिनने ट्विट- 

“मला नेहमी वाटायचं की राशीद एक चांगला गोलंदाज आहे परंतु आता मला कोणतीही शंका नाही की तो टी२०मधील सर्वोत्तम गोलंदाज आहे. त्याच्याकडे फलंदाजीचे कौशल्य आहे. एक चांगला खेळाडू.” असे ट्विट करत सचिनने राशीदचे कौतुक केले होते.

राशीदनेही ट्विट करत मास्टर ब्लास्टरचे आभार मानले आहे होते.

https://twitter.com/rashidkhan_19/status/1000143579723935745?ref_src=twsrc%5Etfw&ref_url=http%3A%2F%2Fmahasports.co.in%2Frashid-khan-world-s-best-spinner-in-t20s-sachin-tendulkar%2F

महत्त्वाच्या बातम्या- 

ना वार्न- ना मुरली, सचिन म्हणतो हा आहे जगातील सर्वोत्तम गोलंदाज

चेतेश्वर पुजाराने इंग्लंड गाजवले, वनडेत पुन्हा एक तुफानी फटकेबाजी

त्याची आयपीएलमधील एक विकेट गेली ३० लाख रुपयांना!

-विजेतेपदामुळे धोनीचा चाहत्यांकडून दुर्लक्षित झालेला क्रिकेट इतिहासातील मोठा विक्रम!

संपुर्ण यादी- आयपीएल २०१८मध्ये या खेळाडूंना मिळाले अॅवार्ड्स

आयपीएलच्या इतिहासातील ही आहे सर्वात वेगळी आकडेवारी

चेन्नई सुपर किंग्जचा हा इतिहास तुम्हाला नक्कीच माहित नसेल!

चेन्नई सुपर किंगमधील खरा ‘किंग’ धोनीच आहे, जाणुन घ्या काय आहे कारण

-धोनी ते वाक्य बोलला आणि चेन्नईच्या चाहत्यांच्या डोळ्यात आले पाणी !

धोनीबद्दल रैना जे बोलला ते खरे करुन दाखवले!

सलग ३ आयपीएल, ३ वेगवेगळे संघ, ३ विजेतेपदं आणि एक खेळाडू

म्हणुनच कर्णधार एमएस धोनी आहे जगातील सर्वात कूल कॅप्टन

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment