जगभरात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीला स्टाइलिश क्रिकेटपटू म्हणून ओळखले जाते. उत्कृष्ट फलंदाजी करणारा विराट सर्वात तंदुरुस्त क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. याच कारणामुळे विराटचा चाहतावर्ग जगभरात पसरला आहे. त्यात महिलांचाही समावेश आहे. यामध्येच पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली याची पत्नी शामिया आरजू हिचाही समावेश आहे. इंस्टाग्रामवर चाहत्यांसोबतच्या एका प्रश्न-उत्तरच्या सत्रादरम्यान शामियाने या गोष्टीचा खुलासा केला आहे.
प्रश्न-उत्तरांच्या ऑनलाईन सत्रादरम्यान इंस्टाग्रामवर एक व्यक्तीने शामियाला प्रश्न विचारला होता. तो असा की, ‘तुला गोलंदाज म्हणून हसन अलीच आवडत असेल. पण तुझा आवडता फलंदाज कोण आहे?’ यावर उत्तर देताना शामियाने रनमशीन विराट कोहलीचे नाव घेतले.
शामियाचे कुटुंब मूळ हरियाणाचे आहे. परंतु सध्या ते दिल्लीमध्ये राहत आहेत. हसन अली आणि शामिया यांचा विवाह 2019 मध्ये झाला होता. दोघांनी दुबईमध्ये एकमेकांसोबत लग्नगाठ बांधली होती.
भारताचा कट्टर विरोधक असलेल्या पाकिस्तान संघाचा खेळाडू हसन अलीच्या पत्नीने विराट कोहलीचे नाव घेत हे दर्शवले की, सीमेच्या पलिकडेही विराटचे चाहते आहेत. पाकिस्तानमध्येही भारतीय खेळाडू विराटचे बरेचसे चाहते आहेत. अनेकदा आपले फोटो किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत ते विराटप्रती आपले प्रेम व्यक्त करत असतात.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने खूप उत्सुकतेने पहिले जातात. चाहते हा सामना पाहण्यासाठी खूप आतुरलेले असतात. परंतु मागील काही वर्षांपासून भारत आणि पाकिस्तान केवळ आयसीसी स्पर्धांमध्येच आमने सामने येतात. भारत आणि पाकिस्तान संघआता आगामी टी20 विश्वचषकात खेळताना दिसतील. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये आयसीसी टी20 विश्वचषक सामन्यांचे आयोजन करण्यात येणार आहे.
सध्या भारतीय संघ विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडमध्ये न्यूझीलंड विरुद्ध विश्व कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना 18 जून पासून ते 22 जून दरम्यान खेळणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
लग्नानंतर रोहित विसरला होता ‘ही’ महत्त्वाची गोष्ट, विराटने डंका पिटत सर्वांपुढे केलंत हसू
फाफ डू प्लेसिसचे धक्कादायक भाष्य; म्हणे, ‘टी२० लीग बनतील आंतराष्ट्रीय क्रिकेटसाठी धोका’
मॉर्गन-बटलर कारकिर्दीतील सर्वात मोठं संकट उभं, ‘या’ कारणामुळे होऊ शकते कारवाई