वेस्ट इंडीजविरुद्धच्या कसोटी आणि वनडे मालिकेनंतर भारताला पाच सामन्यांची टी-20 मालिकाही या दौऱ्यात खेळायची आहे. 3 ऑगस्ट रोजी सुरू होणाऱ्या या मालिकेसाठी बीसीसीआयने बुधवारी (5 जुलै) भारतीय संघ घोषित केला. या संघाचे नेतृत्व हार्दिक पंड्या करणार असून संघात काही महत्वाचे बदल पाहायला मिळाले.
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी जो भारतीय संघ निवडला गेला आहे, त्यात युवा खेळाडूंना प्राधान्य दिले गेले आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma) अशा वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती दिली गेली आहे. तसेच गोलंदाजी आक्रमणात देखील युवा खेळाडूच आहेत. इंडियन प्रीमियर लीग 2023 गाजवणाऱ्या खेळाडूंना या टी-20 मालिकेत संधी मिळाल्याचे दिसते. यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) आणि तिलक वर्मा (Tilak Verma) यांना आयपीएलमधील प्रदर्शनाच्या जोरावर या मालिकेसाठी संघात घेतले गेल. या दोघांचीही पहिल्यांदाच भारताच्या टी-20 संघात निवड झाली आहे.
ऋतुराज गायकवाज, जितेश शर्मा आणि रिंकू सिंग (Rinku Singh) यांना वेस्ट इंडीजविरुद्धच्या या टी-20 मालिकेसाठी संघात संधी मिळणे अपेक्षित होते. पण या तिघांनाही या संघात स्थान दिले गेले नाहीये. संघात ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोन यष्टीरक्षक फलंदाजांना स्थान दिले गेले आहे. अशात प्रत्यक्षात कोण प्लेइंग इलेव्हनचा भाग बनणार, हे पाहण्यासारखे असेल. संजू सॅमसन मोठ्या काळानंतर भारतासाठी खेळताना दिसू शकतो.
बिश्नोई मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वनडे पदार्पणाचा सामना खेळला. पण या सामन्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बाहेरच होता. चाहत्यांना मोठ्या काळानंतर बिश्नोईची फिरकी वैस्ट इंडीज दौऱ्यात दिसू शकते. वेगवान गोलंदाजी आक्रमणात मुकेश कुमार (Mukesh Kumar) याची वर्णी लागली आहे. वेगवान गोलंदाजांमध्ये मुकेशच्या साथीला अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान आहेत.
दरम्यान, ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय संघाला मायदेशात आयोजित केला जाणारा आयसीसी वनडे विश्वचषक खेळायचा आहे. वनडे विश्वचषकात वरिष्ठ खेळाडूंना थकवा जाणवू नये यासाठी वेस्ट इंडीज दौऱ्यात त्यांना विश्रांती दिली गेली आहे. (There have been some big changes in the Indian T20I squad selected for West Indies tour)
वेस्ट इंडीजविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ –
इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, यशस्वी जैसवाल, टिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (कर्णधार), अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, उमरान मलिक, आवेश खान, मुकेश कुमार.
महत्वाच्या बातम्या –
स्मिथ रचणार इतिहास! 100वी कसोटी खेळण्याआधीच नावावर मोठ्या विक्रमाची नोंद
‘मी आजही खेळू शकतो…’, विराटचं नाव घेत कमबॅकविषयी काय म्हणाला डिविलियर्स