भारताचा युवा प्रतिभावान फलंदाज शुबमन गिल याची ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या आगामी मालिकेसाठी भारतीय वनडे आणि कसोटी संघात निवड झाली आहे. 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धा गाजवणाऱ्या शुबमनचा हा ऑस्ट्रेलियातील पहिलाच दौरा आहे. या दौऱ्याच्या तयारीबद्दल त्याने सविस्तर चर्चा केली आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 27 नोव्हेंबरपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. या मालिकेच्या पार्श्वभूमीवर कोलकाता नाईट रायडर्स या फ्रँचायझीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये शुबमन गिलने या मालिकेबद्दलच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरे दिली आहे.
या दौऱ्यावर निवड झाल्याबद्दल शुबमन म्हणाला की, “मी लहान असताना भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑस्ट्रेलियामध्ये होणारे क्रिकेट सामने पाहायचो. आता या दौऱ्यावर माझी निवड झाली आहे त्यामुळे मी खूप उत्साही आहे. माझे काही सहकारीही या दौऱ्यावर माझ्यासोबत असतील. माझं या दौऱ्यासाठी कोणतेही वैयक्तिक लक्ष्य नाही. पण चांगली कामगिरी करण्यासाठी मी उत्साही आहे.”
.@RealShubmanGill #HaiTaiyaar for the tour Down Under.
The flamboyant youngster shares his thoughts about #AUSvIND in a freewheeling chat with @SanjanaGanesan#KKR pic.twitter.com/UVswPjcomI
— KolkataKnightRiders (@KKRiders) November 23, 2020
शुबमन गिलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार प्रदर्शन केले आहे तसेच 19 वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत त्याने पाकिस्तानविरुद्ध शतकही ठोकले होते. आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना गिलने 14 सामन्यात तब्बल 440 धावा कुटल्या. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर त्याची भारतीय संघात निवड झाली आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या आगामी मालिकेसाठी शुबमन गिलव्यतिरिक्त आणखी काही युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. यात रिषभ पंत, संजू सॅमसन, नवदीप सैनी, मोहम्मद सिराज या खेळाडूंचा समावेश आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
मुलाच्या जन्मानंतर विराट पुन्हा परतणार ऑस्ट्रेलियात? मुख्य प्रशिक्षकाचे मोठे विधान
पुकोवस्की की बर्न्स कोणासोबत करणार ओपनिंग? वॉर्नरने दिले ‘हे’ उत्तर
“विराट शिवाय टीम इंडिया म्हणजे स्मिथ, वॉर्नर शिवाय ऑस्ट्रेलिया”