आजकाल कोणत्याही गोष्टींची चर्चा ही सोशल माध्यमांवर जास्त आणि प्रत्यक्ष कमी होते. जागतिक दर्जाच्या कोणत्याही स्पर्धा मोठ्या प्रमाणावर हिट होण्यासाठी सर्वात स्वस्त आणि जबदस्त आवाका असणार माध्यम म्हणजे सोशल मीडिया.
याच सोशल मिडियाचा वापर करून एखादी स्पर्धा किती प्रसिद्ध होऊ शकते हे यावर्षी झालेल्या आयसीसी महिला विश्वचषक स्पर्धेने दाखवून दिले. आयसीसीने याबद्दलची अधिकृत आकडेवारी आज जाहीर केली.
त्यातील फेसबुकची आकडेवारी ही इतर कोणत्याही माध्यमांपेक्षा खूप जास्त होती. या स्पर्धेसाठी आयसीसीने @cricketworldcup आणि @icc असे दोन आयडी असलेली फेसबुक पेज अधिकृतपणे वापरली.
तब्बल १०० मिलियन लोकांनी डिजिटल माध्यमांच्या सहाय्याने या स्पर्धेचे विडिओ पहिले. तब्बल १ बिलियन लोकांच्या नजरेखालून एकदातरी या स्पर्धेची कोणती ना कोणती गोष्ट सोशल मेडियाच्या माध्यमातून गेली.
आयसीसीच्या @cricketworldcup आणि @icc या दोन पेजच्या माध्यमातून तब्बल ६७ मिलियन लोकांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्पर्धेचा आनंद घेतला.