---Advertisement---

इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटीत कोण करणार रोहितसोबत सलामीला फलंदाजी? ‘हे’ आहेत तीन पर्याय

On: शनिवार, जुलै 31, 2021 3:19 PM
---Advertisement---

भारत आणि इंग्लंड संघात ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना ४ ऑगस्टपासून नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज क्रिकेट स्टेडिअमवर खेळण्यात येणार आहे. असे असले, तरीही यामध्ये एक अडचण सोडली, तर भारतीय संघ पूर्णपणे सज्ज झाल्याचे दिसत आहे. भारताचा सलामीवीर फलंदाज म्हणून रोहित शर्माचे स्थान पक्के असल्याचे दिसत आहे. मात्र, दुसऱ्या सलामीवीराची अडचण अद्याप कायम आहे.

रोहितव्यतिरिक्त भारताकडे आहेत ‘हे’ ३ पर्याय
भारतीय संघाचा पहिला सलामीवीर म्हणून रोहितचे प्लेइंग इलेव्हनमधील स्थान निश्चित आहे. त्याचबरोबर भारताकडे दुसऱ्या सलामीवीरासाठी आणखी ३ पर्याय असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये अभिमन्यू इश्वरन, केएल राहुल आणि मयंक अगरवाल या खेळाडूंचा समावेश आहे. यापैकीच एका सलामीवीराला रोहितसोबत डावाची सुरुवात करण्याची संधी मिळेल. (These 2 Players Start India Innings 3)

मयंकला संधी मिळण्याची शक्यता जास्त
रोहितसोबत बलाढ्य इंग्लंड संघाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मयंकला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळण्याची शक्यता जास्त आहे. भारतीय कसोटी संघासाठी मयंकची आतापर्यंतची आकडेवारी चांगली राहिली आहे. त्याने भारताकडून १४ कसोटी सामने खेळताना ४५.७३ च्या सरासरीने एकूण १०५२ धावा कुटल्या आहेत.

याव्यतिरिक्त युवा फलंदाज अभिमन्यू इश्वरनला अजून संधी मिळण्याची वाट पाहावी लागेल. दुसरीकडे संघ व्यवस्थापनाने आधीच सांगितले आहे की, या दौऱ्यात केएल राहुल मधल्या फळीत निवडण्यात आले आहे. अशामध्ये मयंक रोहितसोबत सलामीला फलंदाजी करण्याची जास्त शक्यता आहे.

अशाप्रकारे असू शकते भारतीय संघाची प्लेइंग इल्वेहन
रोहित शर्मा, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह

-कोहली करणार फायद्याचा सौदा, टीम धवनला सतावणाऱ्या ‘या’ श्रीलंकन क्रिकेटरला देणार आरसीबीत संधी!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---