यूएई आणि ओमानमध्ये १७ ऑक्टोबर पासून टी२० विश्वचषक २०२१ स्पर्धेला प्रारंभ झाला आहे. सध्या या स्पर्धेतील पात्रता फेरीतील सामने सुरू आहेत. तर येत्या २३ ऑक्टोबरपासून सुपर १२ फेरीतील सामन्यांना प्रारंभ होणार आहे. यापूर्वी अनेक दिग्गजांनी भविष्यवाणी करायला सुरू केली आहे. दरम्यान ऑस्ट्रेलियाच्या दिग्गज क्रिकेटपटूने देखील उपांत्य फेरीत कुठले ४ संघ प्रवेश करू शकतात याची भविष्यवाणी केली आहे.
माजी भारतीय खेळाडू दिपदास गुप्ता यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना, माजी ऑस्ट्रेलियन खेळाडू ब्रॅड हॉगने म्हटले की, “माझ्या मते ग्रूप १ मधून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. तर ग्रूप २ मधून भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरी गाठतील.” हॉगच्या मते, ऑस्ट्रेलिया संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार नाहीये. तर भारत आणि पाकिस्तान संघ अंतिम फेरीत दाखल होऊ शकतात. हॉगने पुढे म्हटले की, “जर पाकिस्तान संघ भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पराभूत झाला तर, पाकिस्तान संघाच्या चिंतेत वाढ होऊ शकते.”
तसेच पाकिस्तान संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्याबाबत बोलताना हॉग म्हणाला की, “जर पाकिस्तान भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पराभूत झाला, तर त्यांना न्यूझीलंड संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पुनरागमन करण्याची खूप कमी संधी असेल. यामुळे पाकिस्तान संघाच्या उपांत्य फेरीत पोहचण्याच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. पाकिस्तान भारतीय संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात पराभूत झाला तर, मला नाही वाटत की हा संघ अंतिम ४ मध्ये प्रवेश करेल. अशा परिस्थितीत भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करेल.”
असे आहे संपूर्ण वेळापत्रक – (वेळ – स्थानिक प्रमाणवेळेनुसार)
पहिली फेरी –
१७ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत ( दुपारी- २.०० वाजता)
१७ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध स्कॉटलंड, मस्कत ( संध्या- ६.०० वाजता)
१८ ऑक्टोबर – आयर्लंड विरुद्ध नेदरलँड्स, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
१८ ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध नामिबिया, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
१९ ऑक्टोबर – स्कॉटलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत ( दुपारी- २.०० वाजता)
१९ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध बांगलादेश, मस्कत ( संध्या- ६.०० वाजता)
२० ऑक्टोबर – नामिबिया विरुद्ध नेदरलँड, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२० ऑक्टोबर – श्रीलंका विरुद्ध आयर्लंड, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
२१ ऑक्टोबर – बांगलादेश विरुद्ध पापुआ न्यू गिनी, मस्कत ( दुपारी- २.०० वाजता)
२१ ऑक्टोबर – ओमान विरुद्ध स्कॉटलंड, मस्कत ( संध्या- ६.०० वाजता)
२२ ऑक्टोबर: नामिबिया विरुद्ध आयर्लंड, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
२२ ऑक्टोबर श्रीलंका विरुद्ध नेदरलँड, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
सुपर १२ फेरी –
२३ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२३ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
२४ ऑक्टोबर – अ गटातील अव्वल संघ विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
२४ ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
२५ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
२६ ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध वेस्ट इंडीज, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
२६ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
२७ ऑक्टोबर – इंग्लंड विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२७ ऑक्टोबर – ब गटातील अव्वल संघ विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबू धाबी ( संध्या- ६.०० वाजता)
२८ ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
२९ ऑक्टोबर – वेस्ट इंडीज विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
२९ ऑक्टोबर – पाकिस्तान विरुद्ध अफगाणिस्तान, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
३० ऑक्टोबर – दक्षिण आफ्रिका विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
३० ऑक्टोबर – ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
३१ ऑक्टोबर – अफगाणिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
३१ ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
२ नोव्हेंबर: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
२ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
३ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
३ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
४ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध ब गटातील दुसरा संघ, दुबई ( दुपारी- २.०० वाजता)
४ नोव्हेंबर – वेस्ट इंडिज विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
५ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अ गटातील दुसरा संघ, शारजाह ( दुपारी- २.०० वाजता)
५ नोव्हेंबर – भारत विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
६ नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडीज, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
६ नोव्हेंबर – इंग्लंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
७ नोव्हेंबर: न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान, अबुधाबी ( दुपारी- २.०० वाजता)
७ नोव्हेंबर – पाकिस्तान विरुद्ध ब गटातील अव्वल संघ, शारजाह ( संध्या- ६.०० वाजता)
८ नोव्हेंबर – भारत विरुद्ध अ गटातील अव्वल संघ, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
बाद फेरी –
१० नोव्हेंबर – उपांत्य सामना – १, अबुधाबी ( संध्या- ६.०० वाजता)
११ नोव्हेंबर – उपांत्य सामना – २, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)
१४ नोव्हेंबर – अंतिम सामना, दुबई ( संध्या- ६.०० वाजता)






