सध्या आयपीएल 2023च्या तयारीला जोरदार सुरुवात झाली आहे. यंदा आयपीएलचा सोळावा हंगाम असणार असून या हंगामासाठी खेळाडूंचा लिलाव 23 डिसंबरपासून कोचिन येथे होणार आहे. या लिलावात काही मोठ्या नावांवर बोली लागण्याची शक्यता आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेसाठी 10 फ्रेंचायझी संघ आपल्या आवडत्या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी पैसे घेऊन उभे असणार आहेे. या लिलावात त्या खेळाडूंवर विशेष लक्ष अशणार आहे, जे गोलंदाजीच्या जोरावर सामन्याची दिशा बदलवण्याची क्षमता ठेवतात आणि संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलू शकतील.
या लिलावात असे पाच गोलंदाज आहेत, ज्यांच्यावर बोली लागणे निश्चित आहे. या यादीत पहिलेे नाव इंग्लंडच्या रीस टॉपली Reece Toply)याचे आहे. या डावखुऱ्या हाताच्या गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय स्तरावर धमाकेदार प्रदर्शन करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या 6 फुट 7 इंच उंचीच्या गोलंदाजाकडे शेवटच्या षटकांमध्ये देखील दोन्ही बाजूला चेंडू स्विंग करण्याची क्षमता आहे.
या लिलावात टॉपली याच्यावर बोली लावणे प्रत्येक संघासाठी महत्वाचे असणार आहे. त्यााने आशिया खंडाच चांगले प्रदर्शन केले आहे. यावर्षीचे त्याचे भारताविरुद्धचे प्रदर्शन या गोष्टीचे प्रमाण आहे. 75 लाख रुपये आधारभुत किंमत असणाऱ्या या खेेळाडूला आपल्या संघात घेण्यासाठी चढाओढ करताना दिसणार आहेत.
याचबरोबर इंग्लंडच्या सध्याच्या विजयात महत्वाची भुमिका बजावणाऱ्या आदिल रशिद (Adil Rashid) हा देखील लिलावात फ्रेंचायझी संघाच्या आकर्षणाचा केंद्र असणार आहे. सतत विस्फोटक रंगात खेळणाऱ्या फलंदाजांना देखील रशीदने आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आहे. या इंग्लिश गालंदाजाच्या ताफ्यात बरेच हत्यारे आहेत. मात्र, त्याला सर्वात जास्त गुगली आवडते. ज्यात तो मोठ्या फलंदाजांना अडकवतो.
टी20 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया संघासाठी सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या ऍडम झॅंपा (Adam Zampa) याने 2020मध्ये भेदक गोलंदाजीने सर्वांना हैराण करुन सोडले होते. त्याने याआधीच्या तीन हंगामात पुणे आणि बॅंगलोर फ्रेंचायझीचे नेतृत्व केले आहे. बरेच संघ त्याला आपल्या गोटात सामील करु ईच्छित असतील. झॅंपाकडे गडी बाद करण्याची क्षमता आहे आणि त्याने आशिया खंडात चांगली कामगिरी केली आहे. त्यामुळे तो कोणत्याही संघासाठी मॅचविनर ठरु शकतो.
उत्तरप्रदेशचा वेगवान गोलंदाज शिवम मावी (Shivam Mavi) हा यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. मावीने 2018च्या अंडर-19 विश्वचषकात आपल्या वेगाने सर्वांना आश्चर्यचकित केले होते. या खेळाडूला कोलकाता नाईट रायडर्स संघाने 3 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले होते.
न्यूझीलंडचा 30 वर्षीय वेगवान गोलंदाज ऍडम मिल्ने (Adam Milne) आयपीएलच्या या हंगामात बरेच काही कमवण्यासाठी तयार आहे. वाऱ्याचा वेग आणि गडी बाद करण्याची क्षमता ही त्याची ओळख आहे. मिल्ने याने आतापर्यंत चार हंगामात तीन संघाचेे प्रतिनिधित्व केले आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या
यजमानांचा पलटवार, डाव घोषित करण्याच्या घाईने भारत धोक्यात! शांतो-हसनची विक्रमी भागीदारी
पहिल्या कसोटी शतकाला शुबमन गिलने म्हटले खास, मात्र एका गोष्टीमुळे ‘नाराज’