जागतिक क्रिकेटमध्ये काही वर्षांमध्ये खेळाडूंचा स्टाईल आणि फॅशनबद्दलचा दृष्टिकोन फार बदलला आहे. आताच्या काळात क्रिकेटपटूंना फॅशन आणि स्टाईलमध्ये रहायला आवडते. स्टाईलीश खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर वेस्ट इंडीज क्रिकेट संघाचे सध्याचे खेळाडू जरा जास्तच स्टाईलीश आहेत. हे खेळाडू आपल्या अनोख्या स्टाईलमध्ये राहतात.
विंडीजच्या क्रिकेटपटूंना खूपच मस्त समजले जाते, जे मैदानाबाहेर आपल्या स्टाईलीश लाईफस्टाईलसाठी अधिक चर्चेत राहतात. विंडीजच्या काही खेळाडूंच्या बायकादेखील आपल्या सुंदरतेमुळे चर्चेत असतात.
आज आपण या लेखात विंडीज क्रिकेट संघाच्या ५ खेळाडूंचा आढावा घेणार आहोत, ज्यांच्या पत्नींची सुंदरता उल्लेखनीय आहे.
वेस्ट इंडीजच्या या ५ खेळाडूंच्या बायका आहेत खूपच सुंदर- These 5 Players of West Indies have Wives Very Beautiful
५. ड्वेन ब्रावो-
विंडीजच्या स्टाईलीश खेळाडूंमध्ये अष्टपैलू क्रिकेटपटू ड्वेन ब्रावोचाही (Dwayne Bravo) समावेश होतो. यामध्ये ब्रावोला सर्वात स्टाईलीश समजले जाते. ब्रावो आपल्या गोलंदाजी आणि फलंदाजीने चांगले योगदान तर देतोच परंतु त्याचबरोबर तो एक गायक आणि डान्सरदेखील आहे.
ब्रावो एक प्रतिभावान खेेळाडू असून त्याने एक मॉडेल रेजिना रेमजितबरोबर (Regina Ramjit) लग्न केले आहे. त्या दोघांनाही २ मुलेदेखील आहेत.
४. ख्रिस गेल-
टी२० क्रिकेट इतिहासात सर्वात धडाकेबाज फलंदाज म्हणून ओळखला जाणारा विंडीजचा सलामीवीर फलंदाज म्हणजेच ख्रिस गेल (Chris Gayle) होय. त्याची फलंदाजी सर्वांनाच माहित आहे. गेल क्रिकेट जगतातील सर्वात यशस्वी फलंदाजांपैकी एक आहे.
गेलच्या पत्नीचे नाव नताशा बेरिज (Natasha Berridge) आहे. त्याने २००९ मध्ये नताशाबरोबर लग्न केले होते. नताशा खूपच स्टाईलीश असून ती एक पोल डांसर म्हणूनही काम करत होती.
३. कायरन पोलार्ड-
विंडीज संघाचा अष्टपैलू क्रिकेटपटू कायरन पोलार्ड (Kieron Pollard) टी२० क्रिकेट प्रकारातील सर्वोत्तम खेळाडू आहे. त्याचबरोबर तो विंडीजचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधील कर्णधारदेखील आहे. पोलार्डला विंडीजचा महत्त्वाचा खेळाडू समजले जाते.
पोलार्डच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल खूप कमी लोकांना माहित आहे. त्याने जेना अली (Jenna Ali) या बिझनेसवुमन महिलेशी २०१२मध्ये लग्न केले होते. जेना आणि पोलार्ड २ मुलांचे आई-वडील आहेत. जेना खूप सुंदर आहे.
२. डॅरेन सॅमी-
विंडीज क्रिकेट संघातील डॅरेन सॅमी (Darren Sammy) एक मोठे नाव आहे. सॅमीने विंडीज संघाला २ वेळा टी२० विश्वचषकाचे विजेतेपद मिळवून दिले होते. सध्या तो विंडीज संघाचा भाग नाही. परंतु त्याला विंडीज क्रिकेट संंघाचा महान कर्णधार म्हटले जाते.
सॅमी सध्या जगभरात खेळल्या जाणाऱ्या टी२० लीगमधील अनेक लीगमध्ये खेळतो. त्याने २०१०मध्ये कॅथी डॅनियलबरोबर (Cathy Daniel) लग्न केले होते. कॅथी खूप सुंदर असून त्यांना ३ अपत्य आहेत.
१. आंद्रे रसेल-
आंद्रे रसेल (Andre Russell) विंडीज क्रिकेट संघाच्या सर्वात धडाकेबाज अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याच्या खेळीचे सर्वजण चाहते आहेत.
असे असले तरीही त्याच्या पत्नीचेही अनेक चाहते आहेत. त्याने २०१६मध्ये अमेरिकन मॉडेल जॅसिम लोराशी (Jassym Lora) लग्न केले होते. ती खूप सुंदर आहे. ती रसेलचे सामने पाहण्यासाठी काही वेळा स्टेडियममध्येही येत असते. रसेल आणि लोरा यांना एक अपत्य आहे.