जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८-२२ जूनमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना साउथम्प्टनमधील द एजेस बाउल स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड असा हा सामना असणार आहे.
दोन वर्षांमध्ये ६ कसोटी मालिका, १७ सामने खेळून भारतीय संघाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात जागा मिळवली आहे. शुक्रवारी दुपारी जेव्हा या सामन्याला सुरवात होईल तेव्हापासून हा सामना जिंकण्यासाठी विराटसेना आपला पूर्ण जोर लावेल. भारतीय संघ या सामना विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. अशात या चुरशीच्या सामन्यात भारतीय संघाच्या काही उत्कृष्ट कामगिरी केली तर भारतीय संघाला जिंकण्यापासून कोणीच थांबवू शकत नाही. त्याच पाच शिलेदारांचा येथे आढाव घेण्यात आला आहे.
विराट कोहली
जरी विराट कोहलीचे शेवटचे शतक २ वर्षांपूर्वी झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या गुलाबी चेंडू कसोटी सामन्यात आले होते. तरीही विराट कोहली हा भारतीय संघातील एकमेव खेळाडू आहे, त्याने ३ वेळा एका कसोटी मालिकेत ६०० हुन अधिक धावा केल्या आहेत. विराटचा पूर्वीचा इंग्लंड दौराही जबरदस्त होता. त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत १४ सामन्यांमध्ये ८७७ धावा केल्या आहेत. जर त्याने अंतिम सामन्यात सुरुवातीचा काही वेळ खेळपट्टीवर घालवला तर त्याच्याकडून किमान द्विशतकाची अपेक्षा ठेवता येईल.
रोहित शर्मा
न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक कसोटी सरासरी असणारा फलंदाज म्हणजे रोहित शर्मा. दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत प्रथमच त्याला सलामीला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. या पाच कसोटी सामन्यांमध्ये रोहितने ९२.६६ च्या सरासरीने ५५६ धावा केल्या होत्या. त्यात ३ शतक आणि १ द्विशतकाचा समावेश होता. त्यानंतर त्याने ऑस्ट्रेलियाच्या भूमीत अर्धशतके झळकावून परदेशातही आपली कामगिरी सुधारली आणि टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेमध्ये खेळल्या गेलेल्या ११ सामन्यांच्या एकूण १७ डावांमध्ये त्याने ६४.३७ च्या प्रभावी सरासरीने १०३० धावा केल्या. जर सुरवातीला नवीन चेंडूसमोर रोहित सावधानीने खेळला तर न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांना त्याला बाद करणे कठीण जाईल.
रिषभ पंत
भारतीय संघासाठी रिषभ पंत हा अंतिम सामन्यात एक ट्रम्पकार्ड असेल. तो त्याच्या खेळीने कोणत्याही संघाला एक पाऊल मागे टाकू शकतो. मधल्या फळीतील हा यष्टीरक्षक फलंदाज त्याच्या निर्भय फलंदाजी शैलीसाठी ओळखला जातो. ऑस्ट्रेलियाच्या दौर्यावरही याची एक झलक पाहायला मिळाली होती. पंतने आपल्या जोरदार फलंदाजीमुळे भारताच्या ऐतिहासिक कसोटी मालिकेच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. २३ वर्षीय खेळाडूने २० कसोटी सामन्यात १३५८ धावा बनवल्या आहेत. ज्यात ३ शतक आणि ६ अर्धशतक आहेत. त्याचा सर्वाधिक वैयक्तीक खेळी १५९ धावांची आहे. यावर्षी पंतने ६ कसोटी सामन्यात ५१५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याची फलंदाजीची सरासरी ही ६४ हून अधिक राहिली आहे.
रविचंद्रन अश्विन
जागतिक कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यासह २१ व्या शतकामध्ये भारतालाही १०० वा कसोटी सामना जिंकण्याची संधी असेल. अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनची फिरकीची जादू चालली तर कोहलीचेही काम सोपे होईल. या अजिंक्यपद स्पर्धेत अश्विन भारतीय संघाकडून सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने या दरम्यान १३ सामन्यात ६७ विकेट्स घेतल्या आहे.
रोज बाउल मैदान बनवण्यासाठी रेतीचा उपयोग केला गेला आहे. जर उन्हामुळे खेळपट्टी थोडीही कोरडी झाली तर अश्विन आणि त्याचा जोडीदार जडेजा हे सामन्याच्या चौथ्या आणि पाचव्या दिवशी जोरदार कामगिरी करतील..न्यूझीलंडच्या फलंदाजाना त्यांना खेळणे एका गणिताच्या प्रश्नापेक्षा अधिक कठीण होईल.
जसप्रीत बुमराह
बुमराह हा वेगवान गोलंदाजी विभागाचा महत्वपूर्ण भाग असेल. जरी संघात त्याच्यापेक्षा अधिक अनुभवी वेगवान गोलंदाज आहे, परंतु ते त्याच्या एवढे प्रभावी ठरले नाहीत. बुमराहने फक्त १९ कसोटी सामन्यात ८३ विकेट घेतल्या आहेत. पाच वेळेस एका डावात ५ विकेट्स घेतलेल्या या गोलंदाजाची २२.११ ची सरासरी आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये मोहम्मद शमी आणि इशांतच्या अनुपस्थितीत त्याने युवा गोलंदाजांसह भारतीय वेगवान गोलंदाजी विभागाचे नेतृत्व केले होते.
महत्वाच्या बातम्या
माजी कर्णधाराकडून भारतीय संघाला विजयाचा मंत्र, फक्त कॅप्टन कोहलीला करावं लागणार ‘हे’ काम
कसोटी अजिंक्यपद: टॉस ठरणार बॉस! न्यूझीलंडविरुद्ध ‘असा’ आहे कर्णधार कोहलीच्या नाणेफेकीचा विक्रम
भारत-न्यूझीलंड WTC फायनल १४४ वर्षांच्या इतिहासातील ‘सर्वात मोठा सामना’, वाचा यामागची कारणे