---Advertisement---

या 5 अनकॅप्ड खेळाडूंना IPLमधील धमाकेदार कामगिरीचं बक्षीस! टीम इंडियात मिळू शकते संधी?

On: गुरूवार, जून 5, 2025 3:13 PM
---Advertisement---

आयपीएल 2025: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) ने आयपीएल-2025चे विजेतेपद जिंकले. ही आरसीबीची पहिलीच ट्रॉफी आहे. या हंगामात काही अनकॅप्ड खेळाडूंनी चाहत्यांना प्रभावित केले. या खेळाडूंची चमकदार कामगिरी पाहून चाहत्यांना वाटते की त्यांना लवकरच टीम इंडियामध्ये संधी दिली जाऊ शकते.

या 5 अनकॅप्ड खेळाडूंबद्दल जाणून घेऊया

1. वैभव सूर्यवंशी: राजस्थान रॉयल्सकडून खेळताना, या 14 वर्षीय या युवा खेळाडूने 296.56 च्या सरासरीने 252 धावा केल्या. या दरम्यान, एका शतकाचाही समावेश होता. सूर्यवंशीला सुपर ‘स्ट्रायकर ऑफ द सीझन’ हा किताबही देण्यात आला. त्याची भारताच्या 19 वर्षांखालील संघातही निवड झाली आहे.

2. साई किशोर: गुजरात टायटन्सचा डावखुरा फिरकी गोलंदाज साई किशोरने त्याच्या कसदार गोलंदाजीने सर्वांना प्रभावित केले आहे. साई किशोरने 15 सामन्यांमध्ये 19 विकेट घेतल्या आहेत. तो 2022च्या आशियाई खेळांमध्ये भारतीय संघाचा भाग होता.

3. प्रियांश आर्य: पंजाब किंग्जकडून खेळताना, या युवा खेळाडूने 17 सामने खेळले आणि 475 धावा केल्या. या दरम्यान, प्रियांशच्या बॅटमधून एक शतक आणि दोन अर्धशतके आली.

4. यश दयाल: आरसीबीचा हा डावखुरा वेगवान गोलंदाज त्याच्या व्हेरिएशनने सर्वांना प्रभावित केले. दयालला नवीन चेंडू आणि डेथ ओव्हर्सचा तज्ञ गोलंदाज मानले जाते.

5. प्रभसिमरन सिंग: आयपीएल-2025 मध्ये पंजाब किंग्जकडून खेळताना, प्रभसिमरनने 17 सामन्यांमध्ये 160.53 च्या सरासरीने 549 धावा केल्या. यामध्ये चार अर्धशतकांचा समावेश होता. प्रभसिमरनने गेल्या हंगामात 334 धावा केल्या. तो भारताच्या टॉप ऑर्डरला बळकटी देऊ शकतो.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---