क्रिकेटपटूंचे हमशकल दिसणे आता जवळपास साधारण बाब झाली आहे. कारण देशातील लोकसंख्या जशी वाढत आहे, तशी क्रिकेटपटूंच्या चेहऱ्याशी साम्य असलेल्या व्यक्तीही समोर येत आहे. पुर्वी केवळ सचिनच्या चेहऱ्याशी साम्य असलेल्या व्यक्तीचाच सगळीकडे बोलबाला होता. परंतु आता असे राहिले नाही. सध्याच्या काळात अनेक क्रिकेटपटूंचे हमशकल पहायला मिळतात.
असेच काही हमशकल भारतीय खेळाडूंचेही आहेत. या लेखात त्या 6 खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे.
हमशकल असणारे 6 भारतीय खेळाडू- These 6 Man are Indian Cricketers Duplicate
सचिन तेंडुलकर
भारतीय संघाचा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 34 हजार पेक्षा अधिक धावा करणारा एकमेव खेळाडू आहे. परंतु सचिनसारखा संपूर्ण जगतात कोणीही नाही.
हे झालं क्रिकेट जगताच्या बाबतीत. परंतु सचिनसारखा दिसणारा मात्र एक व्यक्ती आहे. त्याचं नाव आहे बलवीर सिंग. बलवीरची उंची, स्टाइल अगदी सचिनसारखी आहे. त्यांन सचिन सोबत कामदेखील केले आहे. याव्यतिरिक्त त्याने टीव्हीवर सचिन म्हणून कामही केले आहे. लुधियानाचा बलवीर सचिनशी 1999 मध्ये भेटला होता. त्यांची ही भेट मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये झाली होती. बलवीर व्यावसायिकरित्या गायक आहे आणि तो अनेक कार्यक्रम करतो. नुकतीच त्याची लॉकडाऊनमध्ये नोकरी गेल्याचे वृत्त आहे.
विराट कोहली
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचे (Virat Kohli) तर अनेक हमशकल पहायला मिळाले आहेत. पाकिस्तानमध्ये एक पिझ्झा बॉय तर चक्क विराट सारखाच दिसतो. त्याचे चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान अनेक फोटो व्हायरल झाले होते.
तसेच पाकिस्तानचा क्रिकेटर अहमद शहजाद हादेखील काही प्रमाणात विराट सारखाच दिसतो. त्याचबरोबर विराटला आपला एक हमशकल भारतामध्ये एका सामन्यादरम्यान भेटला होता.
विरेंद्र सेहवाग
भारतीय संघाचा माजी विस्फोटक फलंदाज विरेंद्र सेहवागचाही (Virender Sehwag) हमशकल आहे. त्याचे नाव आहे जीवन शर्मा. महाराष्ट्रीयन जीवन स्वत: सेहवागचा मोठा चाहता आहे.
जसप्रीत बुमराह
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही (Jasprit Bumrah) एक हमशकल आहे. त्याचे फोटो नुकतेच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. बुमराहचा हा हमशकल भारतात नव्हे तर पाकिस्तानमध्ये पहायला मिळाला होता, तो लाहोरच्या गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि विश्व एकादश सामन्यादरम्यानचा सामना पहायला गेला होता.
शिखर धवन
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा (Shikhar Dhawan) एक हमशकल आहे. धवन आपली मिशी आणि हेअर स्टाइलसाठी ओळखला जातो. आता त्याच्यासारखीच मिशी आणि हेअर स्टाइल असणारा व्यक्ती भेटला आहे. तो व्यक्ती कन्नड चित्रपटांमध्ये टेक्निशियन म्हणून काम करतो.
इशांत शर्मा
भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज इशांत शर्माचा (Ishant Sharma) चेहरा एका फुटबॉलपटूशी हुबेहुब मिळतो. त्या फुटबॉलपटूचे नाव आहे ब्रायन रूईझ. तसेच तो मध्य अमेरिकेच्या ‘कोस्टारिका’ या देशाचा रहिवासी आहे.
इशांत आणि ब्रायन हे त्यांच्या हेअर स्टाइलमुळेही एकसारखे दिसतात.