इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा आपण घर बसल्या आनंद घेत आहोत. मात्र, घर बसल्या सेकंदा-सेकंदाचा खेळाचा हवाला देणारे समालोचक कोण आहेत? याचा आपण कधीही विचार करत नाही. चला तर आज जाणून घेऊयात की, पडद्या मागील कलाकार कोण आहेत, जे आपल्याला खेळा दरम्यान माहिती देत असतात. हे पाच समालोचक आज क्रिकेटमधील सर्वोत्कृष्ट आवाज म्हणूनही ओळखले जातात.
आयपीएलमधील समालोचक केवळ भारतातीलच नाहीत, तर जगभरातील आहेत. यावेळी आयपीएलमध्ये (Indian Premier League) 13 भाषांमध्ये समालोचन केले जात आहे. समालोचक क्रिकेटमध्ये विशेषत: आयपीएलसारख्या हंगामामध्ये मोठी भूमिका बजावतात. कारण, ते सामन्यातील खेळाला चाहत्यांच्या अगदी जवळ नेऊन ठेवतात आणि त्यांचा उत्साह देखील वाढवतात. मैदानावर खेळल्या जाणाऱ्या खेळासाठी समालोचकाला (Commentator) सर्वांत आधी तत्पर राहावे लागते. आता महिला समालोचक देखील आयपीएलचा भाग बनत आहेत.
‘हे’ आहेत 5 सर्वांत भारतीय समालोचक
1. आकाश चोप्रा
भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर आकाश चोप्रा (Aakash Chopra) सध्याच्या आयपीएल 2023 (IPL 2023) स्पर्धेतील सर्वात लोकप्रिय हिंदी समालोचक आहे. कॉमेंट्री बॉक्समधील त्याचे अविस्मरणीय वन-लायनर्स सर्वांची मने जिंकतात, यात कोणतीही शंका नाही. नक्कीच त्याचे शब्द चाहत्यांना भुरळ पाडतात. विनोदी शैलीमधील त्याचे समालोचक प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन करण्यासाठी पुरेसे आहेत. खेळाविषयी चोप्राचे ज्ञान अतुलनीय आहे आणि तो कधीकधी मैदानावरील कर्णधारांपेक्षाही पुढे असतो. गेल्या 5-6 आयपीएल हंगामात चोप्राने सर्वांना आपल्या जादूई शब्दातून खिळवून ठेवले आहे. मागील हंगामापेक्षा प्रत्येक हंगामामध्ये चोप्रा अधिकाधिक यशस्वी होत आहे. एकूणच, त्याच्या समालोचनाव्यतिरिक्त त्याचे स्वतःचे युट्यूब चॅनेलदेखील आहे.
2. जतीन सप्रू
जतीन सप्रू (Jatin Sapru) याने 2008 मध्ये ESPN स्पोर्ट्ससोबत करार केला होता. तेव्हापासून तो कंपनीशी जोडला गेला. त्याने ईएसपीएनसोबत टेलिव्हिजन प्रेझेंटर म्हणून काम सुरू केले, पण पुढे तो एक उत्तम क्रीडा समालोचक म्हणून उदयास आला. गेल्या काही वर्षांपासून स्टार स्पोर्ट्स नेटवर्क क्रिकेटचा मुख्य सूत्रधार सप्रू सुप्रसिद्ध समालोचक म्हणून ओळखला जातो. याआधी तो फक्त पोस्ट कव्हरेज सूत्रधार म्हणून दिसत होता, पण काही काळा नंतर समालोचन म्हणून देखील काम करू लागला. आज तो जवळजवळ प्रत्येक सामन्यात त्याच्या समालोचनाने प्रत्येकाचे मन जिंकून घेतो.
3. संजय मांजरेकर
भारतीय संघाचे माजी दिग्गज क्रिकेटर संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनीही क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर समालोचन करण्यास सुरुवात केली. त्यांनी आपल्या क्रिकेटमुळे बरेच चाहते कमावले, पण त्यांनी समालोचनामुळे चाहत्यांची मने सुद्धा जिंकली आहेत. गेल्या दोन दशकांपासून मांजरेकर दूरचित्रवाणीवर काम करत असून. या समालोचकाने संघर्षांच्या काळात बरेच चढ-उतार पाहिले आहेत.
4. सबा करीम
भारतीय संघातील माजी क्रिकेटपटू सबा करीम (Saba Karim) गेल्या अनेक वर्षांपासून समालोचन करताना दिसून येत आहेत. त्यांच्या खेळाचे आपण सर्वच चाहते आहोत. मात्र, या मिश्कील शैलीमुळे चाहते आजही त्यांच्या खेळाचा आनंद घेऊ शकतात. खेळाप्रमाणे चाहत्यांना समालोकचनावेळी खिळवून ठेवण्याची संधी ते आजही सोडत नाहीत. त्यांच्या समालोचनामुळे प्रेक्षक खेळाशी जोडून राहतात.
5. दीप दासगुप्ता
दीप दासगुप्ता (Deep Dasgupta) 45 वर्षांचे असून समालोचन जगतात त्यांचे नाव सर्वांत लोकप्रिय आहे. त्यांचा सुरेल आवाज प्रेक्षकांना खूप आवडतो. तसेच दासगुप्ता हिंदी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमधून समालोचन करतात. या दोन्ही भाषांमधून त्यांनी आपल्या चाहत्यांना भुरळ पाडली आहे. त्यांची विनोदी प्रवृत्ती प्रेक्षकांना आपलीशी वाटते.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारतीय दिग्गजाने सांगितले IPL 2023मधील सर्वोत्तम फिनिशरचे नाव, समोर कुणीही असो बॅटमधून ओकतो आग
पंचांच्या चुकीची संपूर्ण केकेआरला मोजावी लागली किंमत, सर्व खेळाडूंचा खिसा झाला रिकामा