भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यानच्या तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील अखेरचा सामना हैदराबाद येथे खेळला गेला. रोमांचक ठरलेल्या या सामन्यात भारतीय संघाने सहा गडी राखून विजय मिळवत मालिका 2-1 अशी आपल्या नावे केली. भारतीय संघ आगामी विश्वचषकात चांगली कामगिरी करण्यासाठी उत्सुक आहे. मात्र, सध्या संघ जिंकत असला तरी संघात अशा काही कमजोरी आहेत ज्यावर लवकरात लवकर काम करणे गरजेचे आहे.
1) भुवनेश्वर कुमारचा फॉर्म-
भारताचा सर्वात अनुभवी वेगवान गोलंदाज असलेला भुवनेश्वर कुमार याचा फॉर्म भारतासाठी सर्वात चिंतेची बाब बनला आहे. आशिया चषका पाठोपाठ ऑस्ट्रेलियाविरुद्ध देखील त्याच्या गोलंदाजीवर डेथ ओवर्समध्ये भरपूर धावा गेल्या. भुवनेश्वर विश्वचषक संघात असल्याने तो लवकरात लवकर फॉर्ममध्ये येणे अथवा त्याच्या बाबतीत इतर नियोजन करणे संघ व्यवस्थापनासाठी गरजेचे बनले आहे.
2) युजवेंद्र चहलचे अपयश-
भुवनेश्वर कुमार प्रमाणेच प्रमुख फिरकीपटू युजवेंद्र चहल याचे अपयश देखील भारतीय संघाला काही प्रमाणात भोवतेय. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात तो प्रभावी ठरला असला तरी, आशिया चषक व ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने मोठ्या प्रमाणात धावा लुटविल्या होत्या. ऑस्ट्रेलियात होणाऱ्या विश्वचषकात त्याच्या गोलंदाजीची धार पुन्हा येण्याची प्रार्थना भारतीय चाहते करत असतील.
3) हर्षल पटेलचे अयशस्वी पुनरागमन-
दुखापतीनंतर पुनरागमन करत असलेला वेगवान गोलंदाज हर्षल पटेल हा ऑस्ट्रेलियाविरुद्ध सपशेल अपयशी ठरला. धावा रोखण्यात तसेच बळी मिळवण्यात त्याला अपयश तो तीनही सामन्यात कमालीचा महागडा ठरला. विश्वचषक संघात त्याला संधी मिळाली आहे. मात्र, त्याचा हाच फॉर्म राहिल्यास त्याला विश्वचषकापूर्वीच संघातून बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
4) खराब क्षेत्ररक्षण-
सध्या भारतीय संघ जगातील सर्वात तंदुरुस्त संघ म्हणून ओळखला जातो. मात्र, मागील काही मालिकांपासून भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण अत्यंत खराब होताना दिसत आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय खेळाडूंनी अगदी काही सोपे झेल सोडलेले. विश्वचषकात अशी चूक भारतीय संघ करणार नाही याची खात्री संघ व्यवस्थापनाला घ्यावी लागेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
टी-20 मालिका गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाला नुकसान! आयसीसी रँकिंगमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर
INDvsAUS: विराट-रोहितचे भन्नाट सेलेब्रेशन, व्हिडिओ होतोयं तुफान व्हायरल
INDvsAUS: ‘किंग कोहली’ने पार केली ‘द वॉल’! फिफ्टी करताच केला ‘हा’ मोठा पराक्रम नावावर