शुक्रवार (26 जानेवारी) बाबर आझम साठी खऱ्या अर्थाने खास ठरला. आयसीसी प्लेअर ऑफ द इयर (icc player of the year) आणि आयसीसी वनडे प्लेअर ऑफ द इयर म्हणून शुक्रवारी बाबरची निवड करण्यात आली. बाबर आझम याने मागच्या वर्षी क्रिकेट वनडे क्रिकेटमध्ये विशेष कामगिरी केली. तर टी-20 आणि कसोटी फॉरमॅटमध्येही त्याची कामगिरी चांगली राहिली. याच पार्श्वभूमीवर आयसीसीकडून बाबर त्यांचा सर्वात मोठा पुरस्कार दिला गेला. आप या लेखात आयसीसीने आजपर्यंत दिलेल्या प्लेअर ऑफ द इयर पुरस्करांवर नजर टाकणार आहोत.
बाबर आझम (Babar Azam) मागच्या काही वर्षांमध्ये स्वतःच्या खेळात सुधारणा करताना दिसत आहे. 2022 मध्ये देखील त्याने अशाच प्रकारे स्वतःच्या खेळात सुधारणा केली आणि आयसीसी प्लेअर ऑफ द इयर बनला. आयसीसीने हा पुरस्कार घोषित करण्याआधी बाबरची वनडे प्लेअर ऑफ द इयर म्हणून निवड केली होती. मागच्या वर्षी वनडे फॉरमॅटमध्ये त्याने केलेल्या चमकदार कामगिरीसाठी बाबरला हा पुरस्कार मिळाला होता. वर्षभरात त्याने खेळलेलेल्या 9 वनडे सामन्यांपैकी 8 सामन्यांमध्ये त्याने 50 किंवा त्यापेक्षा जास्त धावा ठोकल्या. यात तीन शतके तर, पाच अर्धशतकांचा समावेश आहे. या 9 सामन्यांमध्ये पाकिस्तान बाबर आझमच्या नेतृत्वात आठ सामने जिंकले, तर एका सामन्यात संघाला पराभव स्वीकारावा लागला.
त्याव्यतिरिक्त 2022 मध्ये बाबरने टी-20 आणि कसोटी फॉरमॅटमध्ये देखील चमकदार कामगिरी केली आणि संघासाठी मॅच विनर ठरला. वनडे क्रिकेटप्रमाणेच त्याने कसोटी फॉरमॅटमध्ये देखील सर्वाधिक संघासाठी वर्षात सर्वाधिक धावा केल्या. टी-20 क्रिकेटमध्ये मात्र बाबर पाकिस्तानसाठी 2022 मध्ये धावांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर होता. त्याच्या एकंदरीत प्रदर्शनाचा विचार करून आयसीसीने वर्षातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू म्हणून निवडले. दरम्यान, 2022 ज्या पद्धतीने बाबर आझमने गाजवले, त्याच पद्धतीने मागच्या अनेक वर्षांमध्ये दिग्गजम क्रिकेटपटू गाजवले आहे. आयसीसीने 2004 साली अशा क्रिकेटपटूंना सन्मान द्यायला सुरुवात केली. बाबर आझम गुरुवारी (26 जानेवारी) प्लेअर ऑफ द इयर ठरणारा 18 वा क्रिकेटपटू ठरला.
आयसीसी पुरुष क्रिकेटपटू ऑफ द इयर 2004 ते 2023
2004- राहुल द्रविड
2005 – अँड्र्यू फ्लिंटॉफ आणि जॅक कॅलिस
2006 – रिकी पाँटिंग
2007 – रिकी पाँटिंग
2008 – शिवनारायण चंद्रपॉल
2009 – मिचेल जॉन्सन
2010 – सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)
2011 – जोनाथन ट्रॉट
2012 – कुमार संगकारा
2013 – मायकल क्लार्क
2014 – मिचेल जॉन्सन
2015 – स्टीव्हन स्मिथ
2016 – रविचंद्रन अश्विन
2017 – विराट कोहली (Virat Kohli)
2018 – विराट कोहली
2019 – बेन स्टोक्स
2021 – शाहीन आफ्रिदी
2022 – बाबर आझम
(‘These’ legends have won the ICC Player of the Year award before Babar Azam, complete list since 2004)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
VIDEO | टीम इंडियाच्या ड्रेसिंग रुममध्ये धोनीची अचानक एन्ट्री, खेळाडूंसह सपोर्ट स्टाफचा खुश
डबल धमाका! फक्त वनडेत नाही तर तिन्ही फॉरमॅटमध्ये बाबर आझम नंबर 1, आयसीसीकडून मिळाला मोठा सन्मान