बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात बांगलादेश संघाने बाजी मारली. रविवारी (4 डिसेंबर) ढाकाच्या शेर ए बांगला स्टेडियमवर हा सामना खेळला गेला असून भारतीय संघाने ‘हाता तोंडाला आलेला घास गमावला’. बांगलादेशने अवघ्या एका विकेटने विजय मिळवला. भारतीय संघाला त्यांच्या सुमार क्षेत्ररक्षणाचा परिणाम म्हणून पराभव स्वीकारावा लागला.
बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाचे फलंदाज एकापाठोपाठ एक विकेट गमावत राहिले. परिणामी भारतीय संघ 50 षटकांच्या या सामन्यात अवघ्या 41.2 षटकात सर्वबाद झाला. यादरम्यान भारतीय फलंदाज 186 धावांपर्यंत मजल मारू शकले. सुरुवातील भारतीय संघ (Team India) सामन्यात मकजोर दिसत होता, पण प्रत्युत्तरात बांगलादेश फलंदाजीला आल्यानंतर त्यांच्या फलंदाजांनी देकील एकापाठोपाठ विकेटस गमावल्या.
बांगलादेशच्या फलंदाजांनीही स्वस्तात विकेट्स गमावल्यामुळे भारतीय संघाकडे सामना जिंकण्याची संधी होती. पण गोलंदाज शेवटच्या 10 षटकांमध्ये एकही विकेट घेऊ शकले नाहीत. पराभवासाठी फक्त गोलंदाजांना कारणीभूत धरून चारणार नाही. कारण भारताच्या इतर खेळाडूंनीही निराशाजनक क्षेत्ररक्षण केले. केएल राहुल (KL Rahul) या सामन्यात यष्टीरक्षकाची भूमिका पार पाडताना दिसला, पण बऱ्याच काळाणे यष्टीपाठी उभा राहिल्यामुळे त्याला अपेक्षित लय न गवसल्याचेच दिसले.
When DK keeps you feel Pant is better, when pant keeps you feel DK is better and then comes the Chad KL Rahul, when he does keeping it feels like anyone is better. #INDvsBAN #INDvsBangladesh pic.twitter.com/iVou0FvU39
— Crypto Cricketer (@cricketcoast) December 4, 2022
राहुलने सामन्याच्या 43 व्या षटकात मेहदी हसन (Mehidy Hasan Miraz) याचा सोपा झेल सोडला, जो भारताला विजय मिळवून देऊ शकत होता. बांगलादेशने 40 व्या षटकात त्यांची 9 वी विकेट गमावली होती. याच षटकातील पुढच्या चेंडूवर वॉशिंगटन सुंदर (Washington Sundar) याच्याकडे झेल घेण्यासाठी संधी होती, पण तो चेंडू जवळ देखील पोहोचला नाही. संघाने जर 43 व्या षटकाती या दोन चुका टाळल्या असत्या, तर नक्कीच सामन्याचा निकाल भारताच्या बाजून लागला असता. झेल सोडल्यानंतर कर्णधार रोहित देखील चांगलाच संता
KL Rahul shouldn't wear Indian jersey for 2 months for dropping this catch. pic.twitter.com/q9HgJkz8rT
— ANSHUMAN🚩 (@AvengerReturns) December 4, 2022
https://twitter.com/AmayPrem7/status/1599405572528689152?s=20&t=zCZiJ5UYy-e5FFDe-JsFJA
10 षटकांमध्ये भारततीय संघाला विजयासाठी फक्त एक विकेट आवश्यक असताना देखील पराभव स्वीकारावा लागला. राहुलने मेहदी हसनची झेल सोडला, तेव्हा त्याने अवघ्या 14 धावा केल्या होत्या. पण या जीवनदाचा फायदा त्याने अगदी योग्य पद्धतीने घेतला आणि सामना नावे केला. हसनने एकूम 39 चेंडू खेळले आणि यामध्ये 38 धावा केल्या. (‘These’ mistakes in the 43rd over cost the Indian team dearly, Rohit Sharma lashed out at Rahul-Washington.)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
या तीन कारणांनी अडले टीम इंडियाचे घोडे! बांगलादेशने दिली न भरून येणारी जखम
ढाकाच्या मैदानावर शाकिबचा इतिहास, वसीम अक्रम आणि वकार युनिस यांना पाडले मागे