आज (8 मार्च) मेलबर्न येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला संघात (India Women’s Vs Australia Women’s) आयसीसी महिला टी20 विश्वचषकातील (ICC Women’s T20 World Cup) अंतिम सामना (Final Match) पार पडला. हा सामना ऑस्ट्रेलियाने 85 धावांनी जिंकला.
या सामन्यात बेथ मुनी या महिला क्रिकेटपटूला स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू (Best Player of The Match) पुरस्काराने गौरविण्यात आले.
यापूर्वी टी२० विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळवण्याचा कारनामा क्लेअर टेलर (इंग्लंड), निकोला ब्राऊन (न्यूझीलंड), शार्लोट एडवर्ड्स (इंग्लंड), अन्या श्रबसोल (इंग्लंड), स्टेफनि टेलर (ऑस्ट्रेलिया), एलिसा हेली (ऑस्ट्रेलिया) या महिला क्रिकेटपटूंनी केला होता.
यामध्ये टेलरने 2009 मध्ये, निकोलाने 2010 मध्ये, एडवर्ड्सने 2012 मध्ये आणि श्रबसोलने 2014 मध्ये या महिला क्रिकेटपटूंना मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते.
त्याचबरोबर 2016 मध्ये स्टेफनीने तर 2018 मध्ये एलिसा या महिला क्रिकेटपटूंनाही सर्वोत्तम खेळाडू म्हणून गौरविण्यात आले होते.
महिला टी20 विश्वचषकातील सर्वोत्तम खेळाडूच्या मानकरी ठरलेल्या क्रिकेटपटू-
क्लेअर टेलर – 2009
निकोला ब्राऊन – 2010
शार्लोट एडवर्ड्स – 2012
अन्या श्रबसोल – 2014
स्टेफनि टेलर – 2016
एलिसा हेली – 2018
बेथ मुनी- 2020






