आयपीएल २०२० सुरू होण्यास आता फक्त काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. या जगप्रसिद्ध स्पर्धेत खेळण्यास सर्व खेळाडू खूप उत्साही असतात. फलंदाज चौकार-षटकार मारून आपली उपयोगिता आणि कौशल्य दाखवतात. धावांची लयलूट होणाऱ्या या स्पर्धेत जर एखादा फलंदाज शून्यावर बाद झाला तर तासनतास केलेल्या सरावावर पाणी पडते.
अशातच, एखाद्या संघाचे अनेक फलंदाज शून्यावर बाद झाले तर त्या संघावर पराभवाची नामुष्की येते. संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात अडचण येते. आज आम्ही आयपीएलच्या इतिहासात ज्या संघांचे खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद झाले आहेत त्या तीन संघांविषयी तुम्हाला सांगणार आहोत.
१) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध संघांपैकी एक आहे. आरसीबीच्या संघात पहिल्या हंगामापासून एकाहून एक सरस फलंदाज सामील होत आले आहेत. तरीही या संघाला आतापर्यंत एकदाही आयपीएलचे विजेतेपद मिळवता आले नाही.
आरसीबी संघाच्या नावे आयपीएलमधील बरेचसे सांघिक विक्रम आहेत. एका सामन्यात सर्वाधिक धावांचा विक्रम हा देखील आरसीबीच्या नावे आहे. परंतु, एक नकोसा विक्रम देखील आरसीबीने आपल्या खात्यात जमा केला आहे. आरसीबीचे ११० फलंदाज आत्तापर्यंत शून्य धावसंख्येवर बाद झाले आहेत. एकाच संघाचे फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार्या संघाच्या यादीत आरसीबी तिसऱ्या क्रमांकावर आहे.
२) मुंबई इंडियन्स
मुंबई इंडियन्स आयपीएलच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने आतापर्यंतचे सर्वाधिक चार वेळा आयपीएलची ट्रॉफी उंचावली आहे. अगदी सुरुवातीपासूनच मुंबईच्या संघात सचिन तेंडुलकर, सनथ जयसूर्या, रोहित शर्मा, रिकी पॉंटिंग यांसारखी एकाहून एक दिग्गज फलंदाज खेळले आहेत.
आयपीएलमधील सर्वात यशस्वी व सर्वात प्रसिद्ध संघ असलेल्या मुंबईच्या फलंदाजांची शून्यावर बाद होण्याची वारंवारिता खूप अधिक आहे. मुंबईचे फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार्या संघांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. त्यांचे ११२ फलंदाज शून्यावर बाद झाले आहेत.
३) दिल्ली कॅपिटल्स
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात अपयशी संघ असा शिक्का बसलेला दिल्ली कॅपिटल्स संघ या यादीत प्रथम क्रमांकावर आहे. वीरेंद्र सेहवाग, एबी डिव्हिलियर्स, माहेला जयवर्धने या दिग्गजांसोबत अनेकांनी दिल्लीसाठी आयपीएलमध्ये आपले हात आजमावले. मात्र, ते या नकोश्या विक्रमापासून संघाला वाचवू शकले नाहीत.
आरसीबी व मुंबई इंडियन्सच्या फलंदाजांना पिछाडत दिल्लीच्या ११७ फलंदाजांनी शून्याची नोंद केली आहे. एकाच संघाचे फलंदाज सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणार्या संघाच्या यादीत दिल्ली आघाडीवर आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-हिंदी येत असूनही इंग्लंडच्या खेळाडूने भासवले येत नसल्यासारखे; ऐकली धोनीची रणनीती, तरीही…
-आश्चर्यम! खेळाडूने षटकार ठोकून स्वतःच्या कारच्या फोडल्या काचा
-मोठी बातमी- सीएसके संघाला धक्का; संघातील सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह
ट्रेंडिंग लेख-
-‘या’ ३ फलंदाजांची नावं ऐकली की आरसीबीच्या गोलंदाजांना सुटतो घाम, केल्यात सर्वाधिक धावा
-क्रिकेटच्या काळ्या अध्यायाची दशकपूर्ती: २०१० स्पॉट फिक्सिंग प्रकरण
-७० शतकांना गवसणी घालणारा किंग कोहली आयपीएल २०२०मध्ये करू शकतो हे ‘विराट’ विक्रम