fbpx
Tuesday, April 20, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

‘या’ ३ फलंदाजांची नावं ऐकली की आरसीबीच्या गोलंदाजांना सुटतो घाम, केल्यात सर्वाधिक धावा

3 Batsman Who Smashed Most Runs Against Royal Challengers Bangalore

August 28, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हा आयपीएलच्या अयशस्वी संघांपैकी एक आहे. ३ वेळा अंतिम सामन्यात पोहोचूनही आयपीएल ट्रॉफी न जिंकण्याचा नकोसा विक्रम आरसीबी संघाच्या नावावर नोंदला गेला आहे.

आरसीबी संघात विराट कोहली, एबी डिविलियर्स, ख्रिस गेल, युवराज सिंग असे एकापेक्षा एक धुरंदर फलंदाज होऊन गेले आहेत आणि त्यापैकी काही फलंदाज आतादेखील संघाचा भाग आहेत. शिवाय संघाचे क्षेत्ररक्षणही चांगले असते. पण, त्यांची सर्वात मोठी कमजोरी राहिले आहेत, त्यांच्या संघातील गोलंदाज. आरसीबीच्या या उणिवेचा आयपीएलमधील काही फलंदाजांना चांगलाच फायदा झाला आहे.

या फलंदाजांनी आरसीबीविरुद्ध खेळताना सर्वाधिक धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, हे तिन्ही फलंदाज आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांचे कर्णधार आहेत. तर बघूयात कोण आहेत ते ३ फलंदाज?

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध सर्वाधिक धावा करणारे तीन फलंदाज (3 Batsman Who Smashed Most Runs Against Royal Challengers Bangalore)  –

३. डेव्हिड वॉर्नर – ६६९ धावा

सनराइजर्स हैद्राबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने आजवर आयपीएलमध्ये एकूण १२६ सामने खेळले आहेत. त्यातील आरसीबीविरुद्ध १५ सामने खेळले आहेत. या १५ सामन्यात वॉर्नरने ७ अर्धशतके आणि १ शतक मारत ६६९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ५९ चौकारांचा आणि ३६ षटकारांचा समावेश आहे.

२. रोहित शर्मा – ६८९ धावा 

आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघाचा कर्णधार रोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत आरसीबीविरुद्ध २६ सामने खेळले आहेत.  त्यात त्याने २९.९५च्या सरासरीने ६८९ धावा केल्या आहेत. यात त्याच्या ७ शतकांचा समावेश आहे. मात्र, आरसीबीविरुद्ध रोहितचे शतक केवळ ६ धावांनी हुकले होते. त्यामुळे त्याची आरसीबीविरुद्धचा सर्वोच्च धावंसख्या ही ९४ इतकी आहे.

१. एमएस धोनी – ७९४ धावा 

चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार एमएस धोनीने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत १९० सामने खेळले आहेत. दरम्यान तो २७ सामन्यात विराट कोहलीच्या आरसीबी संघाविरुद्ध खेळला आहे. या सामन्यात त्याने ४ अर्धशतकांच्या मदतीने सर्वाधिक ७९४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या सर्वाधिक नाबाद ८४ धावांचा समावेश आहे. यंदा आरसीबीविरुद्ध खेळताना धोनी त्याच्या ८०० धावांचा टप्पा पार करु शकतो.

या ३ फलंदाजांव्यतिरिक्त आरसीबीविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत सुरेश रैना आणि गौतम गंभीर यांचा अनुक्रमे चौथा आणि पाचवा क्रमांक लागतो. रैनाने आरसीबीविरुद्ध २८ सामने खेळत ६६१ धावा केल्या आहेत. तर गंभारने २० सामने खेळत ६४७ धावा केल्या आहेत.

ट्रेंडिंग लेख –

७० शतकांना गवसणी घालणारा किंग कोहली आयपीएल २०२०मध्ये करू शकतो हे ‘विराट’ विक्रम

मुंबई इंडियन्सकडून फक्त १ सामना आला नशिबी, त्यातही ‘हे’ २ भारतीय क्रिकेटर ठरले फ्लॉप

लॉकडाऊन दरम्यान या ५ क्रिकेटपटूंनी दिली ‘गुडन्यूज’, ३ भारतीयांचा समावेश

महत्त्वाच्या बातम्या –

मोठी बातमी- सीएसके संघाला धक्का; संघातील सदस्य आढळले कोरोना पॉझिटिव्ह

सीपीएलमध्ये चालली मोहम्मद नबीच्या फिरकीची जादू; दिग्गज फलंदाज फिरकीच्या जाळ्यात

बाप होणार विराट कोहली, पण ट्रोल होतोय सैफ अलीचा मुलगा तैमूर


Previous Post

हिंदी येत असूनही इंग्लंडच्या खेळाडूने भासवले येत नसल्यासारखे; ऐकली धोनीची रणनीती, तरीही…

Next Post

कुटुंबात सर्वात लहान असणाऱ्या विराटचे संपूर्ण कुटुंब, पाहा

Related Posts

Photo Courtesy: Twitter/IPL
IPL

दिल्ली कॅपिटल्ससाठी खुशखबर! मुंबई विरुद्धच्या सामन्याआधी ‘हा’ घातक गोलंदाज झाला फिट

April 20, 2021
Photo Courtesy: Screengrab/@RCBTweets
IPL

याला विमानातून खाली फेका रे! ‘मिस्टर नॅग्स’ची बडबड ऐकून विराटने दिला असा आदेश, पुढं काय झालं पाहा

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/ChennaiIPL.
IPL

जडेजाला मोलाचा सल्ला देत ‘कॅप्टनकूल’ने पुन्हा दाखवली नेतृत्त्वाची चुणूक, गावसकरांनी ‘या’ शब्दात केलं कौतुक

April 20, 2021
Photo Courtesy:iplt20.com
IPL

त्याच्यात महान टी२० फलंदाजाची चिन्हे, तो आयपीएलचा सुपरस्टार आहे; कैफने ‘या’ फलंदाजाची केली स्तुती

April 20, 2021
Photo Courtesy: Instagram/@sakariya.chetan
IPL

‘ड्रीम विकेट’ घेतल्यानंतर सकारियाची धोनीशी भेट; म्हणाला, ‘तुमच्यासारखे दुसरे कोणीही नाही’

April 20, 2021
Photo Courtesy: Twitter/@IPL/@cricketaakash
IPL

‘जेव्हा सुर्यास्त होतो, तेव्हा..’ समालोचक आकाश चोप्राने धोनीबद्दल केलं असं काही भाष्य, उडाली खळबळ!

April 20, 2021
Next Post

कुटुंबात सर्वात लहान असणाऱ्या विराटचे संपूर्ण कुटुंब, पाहा

आयपीएलमधील या तीन संघाचे फलंदाज झालेत सर्वाधिक वेळा शून्यावर बाद

अर्ध्या रिंगमध्ये फोन उचलण्याचं वचन धोनी खरंच पाळणार का, हा खेळाडू घेणार टेस्ट

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.