आयपीएल २०२१ अचानकपणे स्थगित करावी लागल्यानंतर सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष पुढील महिन्यात इंग्लंड येथे होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याकडे लागली आहे. भारत आणि न्यूझीलंडचे संघ या अंतिम फेरीत आमने-सामने येतील. या अंतिम सामन्यानंतर भारतीय संघ इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका देखील खेळणार आहे. त्याचवेळी बीसीसीआयने स्पष्ट केले आहे की, भारतीय संघ इंग्लंडमध्ये खेळत असताना, आणखी एक भारतीय संघ श्रीलंकेत मर्यादित षटकांच्या मालिका खेळेल. श्रीलंका दौर्यावर चांगली कामगिरी करून काही युवा खेळाडू भारताच्या वरिष्ठ संघातील आपली जागा पक्की करू शकतात.
हे असू शकतात कर्णधार
इंग्लंड दौऱ्यासाठी निवड झालेल्या संघातील एकही खेळाडू श्रीलंका दौऱ्यावर जाणार नाही. त्यामुळे या दौऱ्यासाठी भारताचा दुय्यम संघ पाठवला जाऊ शकतो. ज्यामध्ये अनेक युवा खेळाडूंचा समावेश असेल. आयपीएलपूर्वी दुखापतग्रस्त झालेला मधल्या फळीतील फलंदाज श्रेयस अय्यर तंदुरुस्त असल्यास तो या संघाचे नेतृत्व करू शकतो. अय्यर उपलब्ध नसल्यास संघातील सर्वात वरिष्ठ खेळाडू सलामीवीर शिखर धवनकडे नेतृत्व दिले जाऊ शकते. भुवनेश्वर कुमार, हार्दिक पंड्यादेखील कर्णधारपदासाठी पर्याय आहे.
या युवा खेळाडूंना मिळू शकते संधी
भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर ३ वनडे व ३ टी२० सामने खेळणार आहे. या दौऱ्यावर संधी मिळालेले खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करून भारताच्या प्रमुख संघात जागा पटकावू शकतात. आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना या संघात संधी दिली जाऊ शकते.
यामध्ये राहुल तेवतिया, राहुल त्रिपाठी, हर्षल पटेल, देवदत्त पडिक्कल, चेतन सकारिया हे खेळाडू आंतरराष्ट्रीय पदार्पण करू शकतात. तर ईशान किशन सूर्यकुमार यादव, राहुल चहर व संजू सॅमसन हे आगामी टी२०विश्वचषकासाठी भारतीय संघात जागा मिळविण्यासाठी प्रयत्न करताना दिसतील.
असा असू शकतो भारतीय संघ
शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यर (निवड फिटनेसवर अवलंबून आहे), सूर्यकुमार यादव, ईशान किशन, नितीश राणा, हार्दिक पंड्या, देवदत्त पडिक्कल, संजू सॅमसन, राहुल तेवतिया, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, राहुल चहर , भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, नवदीप सैनी, हर्षल पटेल, चेतन साकारिया.
महत्त्वाच्या बातम्या –
भविष्यातील स्टार! मिडल स्टंपने फलंदाजी करणाऱ्या ९ वर्षीय चिमुकल्याच्या मदतीला आला ‘हा’ आयपीएल संघ
रॉबिन उथप्पाच्या पत्नीने दिला जुन्या आठवणींना उजाळा, मग साक्षीनेही दिली ‘ही’ क्यूट प्रतिक्रिया