---Advertisement---

‘हे’ ३ विकेटकीपर पंतसाठी आहेत धोक्याची घंटा! यष्टीपुढे अन् यष्टीमागे प्रदर्शनात आहेत त्याच्या बरोबरीचे

On: मंगळवार, जुलै 27, 2021 8:18 PM
---Advertisement---

सध्या भारतीय संघात अनेक उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, जे नेहमीच आपल्या खेळाच्या आणि कौशल्याच्या जोरावर संघाला विजय मिळवून देण्यात मोठे योगदान देत आहेत. अशातच भारतीय संघात नेहमी आपले स्थान कायम ठेवणे हे आव्हान बनले आहे. सध्या असेच काहीसे आव्हान रिषभ पंतसमोर आहे. महेंद्रसिंग धोनीच्या रूपात भारतीय संघाला एक अत्यंत मुत्सद्दी यष्टीरक्षक मिळाला होता. परंतु त्याच्या निवृत्तीनंतर अनेक यष्टीरक्षकांना भारतीय संघात स्थान देण्यात आले आणि त्यातील सर्वात जास्त काळ रिषभ पंतला स्थान मिळवू शकला. त्याला संघातील यष्टीरक्षक फलंदाजांच्या स्थानासाठी मुख्य दावेदार मानले जात आहे.

असे असले तरीही पंतसमोर आता ३ यष्टिरक्षकांचे आव्हान असणार आहे, जे कोणत्याही बाबतीत रिषभ पंतपेक्षा कमी नाहीत. पंतला संघात आपले स्थान कायम ठेवायचे असल्यास यष्टीपुढे आणि यष्टीमागे सातत्याने चांगली खेळी करत राहावे लागणार आहे.

१) केएल राहुल – रिषभ पंतला सर्वात मोठे आव्हान आहे ते म्हणजे केएल राहुलचे. कारण राहुलने आतापर्यंत अनेक सामन्यात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिन्ही स्वरूपात राहुलने आपले कौशल्य दाखवले आहे, ज्यामुळे तो संघातील मुख्य यष्टिरक्षक फलंदाजांसाठी दावेदार असल्याचे दिसत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये राहुलने चांगली कामगिरी केली आहे आणि राहुलने पंतच्या अनुपस्थितीत खूप वेळा यष्टिरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळवले आहे. त्यामुळे राहुलला पंतचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी मानले जात आहे.

२) ईशान किशन – या यादीत ईशान किशनचाही समावेश आहे. या युवा खेळाडूने गेल्या दोन वर्षात आपल्या खेळाने भारतीय संघातील आपली दावेदारी स्पष्ट केली आहे. आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना या खेळाडूने उत्कृष्टरित्या आपल्या कौशल्याचे दर्शन घडवून दिले आहे. नुकतेच श्रीलंका दौऱ्यावरही त्याने फलंदाजी आणि यष्टीरक्षणात दमदार कामगिरी केली आहे. म्हणूनच ईशान किशन सुद्धा भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून स्थान मिळविण्याचा दावेदार आहे.

३) संजू सॅमसन – गेल्या काही काळात आयपीएल आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये उत्कृष्ट फलंदाजी करत असलेला संजू सॅमसनसुद्धा या यादीत आहे. ज्याने आपल्या आक्रमक फलंदाजीच्या जोरावर क्रिकेटरसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. गेल्या काही वर्षातील सॅमसनचे प्रदर्शन पाहता तोही भारतीय संघात आपले स्थान मिळवण्याचा पक्का दावेदार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

आक्रमक फलंदाजी बनलीय ‘या’ खेळाडूंची ओळख, वनडेत १२०पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने कुटल्यात धावा

‘सूर्यकुमार यादव फलंदाजच आहे तसा, तो भविष्यात मोठमोठी शतके ठोकेल,’ पाकिस्तानातून कौतुक

‘सत्तर वर्षांनंतर पुनरागमन करतोय’ म्हणत चहलकडून भुवीची थट्टा, मग काय चिडला सिनीयर गोलंदाज

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---