नुकतेच इंग्लंड क्रिकेट संघाचा धडाकेबाज फलंदाज जो रूटने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडले. त्याच्या या निर्णयाने सर्वांनाच मोठा धक्का दिला होता. त्याच्या नेतृत्वात इंग्लंड संघाला ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी मालिकेत दारुण पराभवाचा सामना करावा लागलेला. यानंतरच त्याने हा मोठा निर्णय घेतला. रूटने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीप्रमाणेच आपल्या चाहत्यांनाही निराश केले. विराटनेही दक्षिण आफ्रिकेमध्ये मिळालेल्या पराभवानंतर अचानक कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला होता. दुसरीकडे बुधवारी (२० एप्रिल) विस्डेन क्रिकेटने जो रूटला शानदार कामगिरीसाठी आघाडीचा क्रिकेटपटू म्हणून निवडले. विशेष म्हणजे, विस्डेनच्या यादीत भारतीय खेळाडूंचाही समावेश आहे.
सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून केली जो रूटची निवड
इंग्लंडचा कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर एका आठड्यातच जो रूटला (Joe Root) बुधवारी सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून निवडले. दुसरीकडे दक्षिण आफ्रिका महिला संघाची फलंदाज लिजेल ली हिला चांगली कामगिरी केल्यामुळे विस्डेन महिला क्रिकेटपटू म्हणून निवडण्यात आले. जो रूटसाठी मागील हंगाम शानदार राहिला होता. त्या हंगामात त्याने ६ शतके झळकावली होती. दुसरीकडे, त्याचा संघ विजयासाठी संघर्ष करत होता.
Joe Root in Test cricket in 2021:
1,708 runs @ 61.00
4 half-centuries, 6 centuries
Highest score of 228The 31-year-old has been named as Wisden's Leading Cricketer in the World for the first time 👏#WisdenAwards pic.twitter.com/BSEGBC62R7
— Wisden (@WisdenCricket) April 20, 2022
रूटने मागील वर्षात १५ सामन्यांमध्ये ६१च्या सरासरीने १७०८ धावा केल्या होत्या. यामध्ये ४ अर्धशतक आणि ६ शतकांचा समावेश होता. त्याने ३० हजारांहून अधिक चेंडू खेळले होते. मात्र, तो फक्त एकदा शून्य धावसंख्येवर बाद झाला होता. दुसरीकडे त्याच्या नेतृत्वावर नजर टाकली, तर इंग्लंडने त्याच्या नेतृत्वात मागील १७ सामन्यांमध्ये फक्त १ सामना जिंकला होता. नेतृत्वात होणाऱ्या खराब प्रदर्शनामुळे त्याला कर्णधारपदावरूनही हटण्याचा निर्णय घेतला गेला.
🏏 The Five Wisden Cricketers of the Year 🏏
Jasprit Bumrah
Devon Conway
Rohit Sharma
Ollie Robinson
Dane van Niekerk#WisdenAwards pic.twitter.com/gY3wpfn2TS— Wisden (@WisdenCricket) April 20, 2022
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
हे खेळाडूही झाले विस्डेन क्रिकेटर ऑफ द इअर २०२१च्या यादीत सामील
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) इंग्लंड दौऱ्यावर शानदार कामगिरी केली होती. त्यासाठी त्यांना विस्डेन क्रिकेटर ऑफ द इअर २०२१च्या यादीत सामील केले गेले. या दोघांव्यतिरिक्त न्यूझीलंडचा सलामीवीर डेवॉन कॉनवे, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन आणि दक्षिण आफ्रिका महिला संघाची कर्णधार डेन वन निकर्कही या यादीत सामील आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
जेव्हा मैदानात घोंगावलं होतं पोलार्ड नावाचं वादळ, श्रीलंकेविरुद्ध एकाच षटकात ठोकले होते सलग ६ षटकार
चेन्नईच्या सलामीवीराने लग्नासाठी सोडला बायोबबल, जाणून घ्या कधी होणार पुनरागमन
मोठी बातमी! चेन्नई संघात नव्या भिडूची एन्ट्री, ‘हा’ १९ वर्षीय खेळाडू घेणार ऍडम मिल्नेची जागा