---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफी प्रकरणी आयसीसीकडे 3 पर्याय, पाकिस्तान बीसीसीआयपुढे झुकणार का?

On: शुक्रवार, नोव्हेंबर 29, 2024 10:19 AM
india vs pakistan terror attack
---Advertisement---

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेवर धोक्याचे ढग दाटून आले आहेत. एकीकडे बीसीसीआयने आपला संघ पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील आपली भूमिका स्पष्ट केली आहे की त्यांना संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानमध्येच आयोजित करायची आहे. याशिवाय पीसीबीही हायब्रीड मॉडेल स्वीकारण्यास तयार नाही. दरम्यान, आयसीसीने आज 29 नोव्हेंबर रोजी बैठक बोलावली आहे. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर सखोल चर्चा होऊ शकते. हे जाणून घेऊया?

या व्हर्च्युअल मीटिंगला आयसीसीचे सर्व 12 पूर्ण सदस्य आणि 3 सहयोगी सदस्य उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत तीन विषयांवर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हायब्रीड मॉडेल

पीसीबी हायब्रीड मॉडेल नाकारत असल्याचं सांगत असले तरी अलीकडे हायब्रीड मॉडेलची चर्चा तीव्र झाली आहे. हायब्रीड मॉडेल लागू केल्यास भारताचे सामने यूएईमध्ये होतील. अशी अटकळ बांधली जात आहे. हायब्रीड मॉडेलचा अवलंब करण्याची शक्यता आहे. कारण यामुळे, पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद सोडावे लागणार नाही. तर भारताला सुरक्षा व्यवस्थेचा विचार करावा लागणार नाही. मात्र याबाबत अद्याप काहीही स्पष्ट झालेले नाही, त्यामुळे इतर पर्यायांवरही बैठकीत विचार केला जाणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना पाकिस्तानात व्हावा!

जेव्हा-जेव्हा भारत-पाक सामना होईल तेव्हा तो पाकिस्तानमध्येच खेळला जावा, अशी पाकिस्तानकडून मागणी होऊ शकते. याशिवाय फायनलही पाकिस्तानात खेळवण्याची मागणी पीसीबी करू शकते. भारतीय संघाने सीमा ओलांडण्यास स्पष्ट नकार दिल्याने, भारत-पाक सामना पाकिस्तानमध्ये आयोजित करण्याचा पर्याय रद्द केला जाऊ शकतो.

संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर

पाकिस्तानने कोणत्याही परिस्थितीत हायब्रीड मॉडेल स्वीकारले नाही. तर आयसीसीला पाकिस्तानकडून चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद काढून घेण्यास भाग पाडले जाऊ शकते. अशा परिस्थितीत संपूर्ण स्पर्धा पाकिस्तानबाहेर हलवली जाऊ शकते. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अशी परिस्थिती उद्भवल्यास श्रीलंकेला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषवण्याची संधी दिली जाऊ शकते.

हेही वाचा-

“पलटन माझ्या हृदयात नेहमीच… “, मुंबई इंडियन्सपासून विभक्त झाल्यानंतर इशान किशन भावूक
पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद गमावणार? लवकरच आयसीसीची निर्णायक बैठक
ऑस्ट्रेलियाचे मंत्री देखील विराट कोहलीचे मोठे चाहते, म्हणाले, “मला त्याचा खेळ आवडतो, कारण तो…”

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---