आयसीसी वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेच्या 7 दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला तगडा झटका बसला आहे. संघाचा स्टार फिरकीपटू ऍश्टन एगर विश्वचषक 2023मधून बाहेर पडला आहे. तो अजूनही दुखापतीतून सावरू शकला नाहीये. अशात तो क्रिकेटच्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ शकणार नाहीये. एगर त्याच्या या दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही खेळू शकला नव्हता. अशात एगरचे संघाबाहेर होणे ऑस्ट्रेलियासाठी मोठा धक्का असल्याचे बोलले जात आहे.
ऍश्टन एगर (Ashton Agar) याच्याविषयी बोलायचं झालं, तर तो मागील काही काळापासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी तो पश्चिम ऑस्ट्रेलियासोबत सराव करत होता. त्यावेळी त्याला दुखापत झाली होती. त्याला वनडे मालिकेसाठी संघात सामील केले गेले होते, पण तो पहिल्या सामन्यानंतरच ऑस्ट्रेलियाला परतला होता. तो आपल्या मुलाच्या जन्मावेळी कुटुंबासोबत होता आणि भारताचा दौरा करू शकला नव्हता. असे असूनही तो वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया संघाचा भाग होता. अशी अपेक्षा होती की, तो वेळेवर फिट होईल, पण असे काही झाले नाही.
https://twitter.com/CricCrazyJohns/status/1707272148178653520
खरं तर, यापूर्वी ऍश्टन एगर फेब्रुवारी-मार्च महिन्यात कसोटी मालिकेसाठी भारतात आला होता. मात्र, त्याला एकही सामना न खेळता ऑस्ट्रेलियाला पाठवण्यात आले होते. एगरला पहिल्या दोन कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली नव्हती. त्यानंतर त्याला परत पाठवले होते.
विश्वचषकात कोण घेणार जागा?
वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेसाठी 15 खेळाडूंच्या स्क्वॉडमध्ये बदल करण्याचा 28 सप्टेंबर हा शेवटचा दिवस आहे. अशात वृत्तांनुसार, ऍश्टन एगर याच्या जागी ऑस्ट्रेलियन संघात मार्नस लॅब्यूशेन, तन्वीर संघा आणि मॅथ्यू शॉर्ट यांच्यापैकी एकाला जागा मिळेल असे बोलले जात आहे.
https://twitter.com/mufaddal_vohra/status/1707284962918179256
एगरची वनडे कारकीर्द
ऍश्टन एगर हा 29 वर्षांचा असून त्याने ऑस्ट्रेलियाकडून एकूण 22 वनडे सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 21 विकेट्स घेतल्या आहेत. 31 धावा खर्चून 2 विकेट्स ही त्याची वनडेतील सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी आहे. त्याने 18 वनडेत 24.76च्या सरासरीने आणि 82.98च्या स्ट्राईक रेटने 322 धावा केल्या आहेत. 48 धावा त्याची वनडेतील सर्वोत्तम कामगिरी आहे. (this australian cricketer ruled out from world cup 2023)
हेही वाचा-
अर्रर्र! बुमराहने 3 विकेट्स घेऊनही नावावर झाला लाजीरवाणा विक्रम, 6 वर्षांनंतर बूम बूमची खराब गोलंदाजी
चाहत्याचा शाहरुखला कोहलीबद्दल ‘तो’ प्रश्न; किंग खान म्हणाला, ‘माझं विराटवर खूप प्रेम, तो तर जावयासारखा…’