दक्षिण आफ्रिका संघाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज मार्क बाऊचरने आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्याने अनेक वर्षे दक्षिण आफ्रिकेकडून क्रिकेट खेळले आणि अनेकवेळा सामना विजेत्याची भूमिकाही निभावली. बाऊचरने फलंदाजीबरोबरच यष्टीरक्षकाची जबाबदारीही उत्तमरित्या पार पाडली.
मार्क बाऊचर आहे दक्षिण आफ्रिका संघाचा दिग्गज खेळाडू-
बाऊचर (Mark Boucher) हा दक्षिण आफ्रिका संघातील यशस्वी खेळाडूंपैकी एक आहे. त्यामुळे त्याची कामगिरी मोठी आहे. त्याने आपल्या संघात खेळाडू असताना मोलाचे योगदान दिल्यानंतर सध्या तो दक्षिण आफ्रिका संघाचा मुख्य प्रशिक्षक आहे.
तो दक्षिण आफ्रिकेचा मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाच्या कामगिरीत स्थिरता आणण्याचा प्रयत्न करत आहे. बाऊचरला दक्षिण आफ्रिकेच्या (South Africa) क्रिकेट संघात मोठा मान आहे. त्याची कामगिरी जवळपास सर्वांनाच माहित आहे. परंतु बाऊचरबद्दल एक अशी गोष्ट आहे जी खूप कमी चाहत्यांना माहित असेल.
बाऊचरचे आपल्याच मित्राच्या बहिणीबरोबर होते अफेअर-
बाऊचरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल एक गोष्ट खूप कमी चाहत्यांना माहित असेल. ती अशी की, त्याने आपल्या संघसहकाऱ्याच्या बहिणीबरोबर प्रेम झाले होते. त्यामुळे त्यांचे अफेअर खूप काळ चालले होते. परंतु बाऊचरने तिच्याशी लग्न केले नाही.
माजी यष्टीरक्षक बाऊचरचे अफेअर इतर कोणाशी नसून आपल्याबरोबर अनेक सामने खेळलेल्या नील मॅकेन्झीच्या (Neil McKenzie) बहिणीबरोबर चालू होते. दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज फलंदाज मॅकेन्झीची बहीण मेगनबरोबर (Megan) बाऊचरचे अफेअर होते.
नील मॅकेन्झीच्या बहिणीबरोबर होते अफेअर, परंतु लग्न केले नाही-
मॅकेन्झी आणि मेगन दोघांनीही एकमेकांना पसंद केले होते. काही वर्षांपर्यंत त्यांनी एकमेकांना डेट केले होते. तसेच दोघेही रिलेशनशीपमध्ये होते, परंतु त्यांचे नाते लग्नापर्यंत जाण्यापूर्वीच तुटले. त्यानंतर बाऊचरने २०१७मध्ये कारमेन लोटरशी (Carmen Lotter) लग्न केले होते.
मॅकेन्झीची बहीण मेगन दक्षिण आफ्रिकेची एक मॉडेल आहे आणि ती खूप हॉटदेखील आहे. इतकेच नव्हे तर मेगनची २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेची सर्वात बोल्ड महिला म्हणून निवड करण्यात आली होते.
मेगन आपल्या हॉटनेसमुळे मोठमोठ्या स्पोर्ट्स मॅगझिनसाठी मॉडेलिंग करते. तसेच अनेक मॅगझीनच्या कव्हर पेजवर ती सतत झळकत असते. परंतु बाऊचरने तिच्याशी अफेअर असूनही नंतर लग्न केले नाही.
बाऊचरने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत दक्षिण आफ्रिकेकडून १४७ कसोटी आणि २४७ वनडे आणि २५ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ५५१५, वनडेत ४८८६ आणि टी२०त २६८ धावा केल्या आहेत.
याव्यतिरिक्त त्याने यष्टीमागे कसोटीत ५३२, वनडेत ४०३ आणि टी२०त १८ झेलही घेतले आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-भारताला चँपियन बनवणारा प्रशिक्षक म्हणतोय, मला परत टीम इंडियासोबत काम करायचंय
-ठरलं तर! या तारखेला होणार टी२० विश्वचषकाचा अंतिम निर्णय
-ऑस्ट्रेलियात होणारा ‘तो’ कसोटी सामना जिंकणे टीम इंडियासाठी केवळ अशक्य