भारतीय पुरूष क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे सुरू असलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतून बाहेर झाला आहे. पाठीच्या दुखापतीमुळे (Back stress fracture)तो पहिल्या सामन्यातही खेळला नाही. शुक्रवारी (30 सप्टेंबर) भारताच्या संघनिवड अधिकाऱ्यांनी त्याच्याजागी एका वेगवान गोलंदाजाला संघात घेतले आहे. तो उर्वरित दोन सामन्यासाठी संघाशी जोडला जाणार आहे.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या जागी मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) याची भारताच्या टी20 संघात जागा पक्की झाली आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी संघात प्रवेश केला आहे. असे वृत्त खुद्द बीसीसीआयने ट्वीट करत दिले आहे.
???? NEWS ????: Mohd. Siraj replaces injured Jasprit Bumrah in T20I squad. #TeamIndia | #INDvSA
More Details ????https://t.co/o1HvH9XqcI
— BCCI (@BCCI) September 30, 2022
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेतील उर्वरित दोन सामने 2 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबरला अनुक्रमे गुवाहाटी आणि इंदोर येथे खेळले जाणार आहेत.
बुमराह त्याच्या दुखापतीमुळे टी20विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022)स्पर्धेला मुकला आहे. त्याने दुखापतीतून परतल्यावर नुकत्याच पार पडलेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेतून संघात पुनरागमन केले होते. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यापूर्वीच तो पाठीच्या दुखापतीमुळे सामन्यात खेळला नाही. याबाबत बीसीसीआयने ट्वीटही केले होते.
बुमराहला पाठीच्या समस्येमुळे आशिया चषक 2022 या स्पर्धेसही मुकावे लागले होते. नंतर त्याने राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेतले. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचे दोन टी20 सामने खेळले. यामध्येही त्याने काही विशेष कामगिरी केली नाही. त्याने मोहाली येथे झालेला पहिला सामना खेळला नाही तर दुसऱ्या आणि तिसऱ्या टी20 सामन्यात तो खेळला. यामध्ये त्याला केवळ एकच विकेट घेता आली.
बुमराह टी20 विश्वचषक 2022च्या स्पर्धेत खेळणार नाही हे वृत्त बीसीसीआयने अधिकृतपणे जाहीर केले नाही, मात्र आता तो दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेला मुकला असल्याने जवळपास तो विश्वचषकासही मुकणार हे निश्चित आहे. त्याच्याआधी रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा टी20 विश्वचषकास मुकला आहे. तो सध्या गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ-
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, उमेश यादव, हर्षल पटेल, दीपक चहर, शाहबाज अहमद, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘हे’ तिघे भरून काढणार टी-20 विश्वचषकात बुमराहची कमी! एकाने भारतासाठी खेळलेत फक्त तीन सामने
ऑस्ट्रेलिया लिजेंड्सला धूळ चारत सचिनची इंडिया लिजेंड्स फायनलमध्ये, दोन दिवस चालला उपांत्य सामना






