सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्याचा मान भारतीय संघाने मिळवला होता. मात्र, बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघाने अंतिम सामन्यात 209 धावांनी पराभवाचं पाणी पाजत भारताला उपविजेते पदावर समाधान मानण्यास भाग पाडलं. या पराभवानंतर भारतीय संघावर चोहो बाजूंनी टीकास्त्र डागण्यात आले होते. अशात माजी खेळाडू आकाश चोप्राने भारताच्या पराभवाची जबाबदारी घेतली आहे. खरं तर, त्याने एका युजरच्या कमेंटवर मजेशीर रिप्लाय दिला आहे.
दिग्गज फलंदाज सुनील गावसकर (Sunil Gavaskar) आणि इतर अनेक माजी क्रिकेटपटूंनी भारताच्या संघ निवडीपासून ते रणनीतीपर्यंत सर्वांना जबाबदार ठरवले. विराट कोहली, रोहित शर्मा आणि चेतेश्वर पुजारा यांसारख्या खेळाडूंना आपल्या शॉटच्या निवडीमुळे दिग्गजांच्या रोषाचा सामनाही करावा लागला.
अशातच एका युजरने ट्विटरवर आकाश चोप्रा (Aakash Chopra) याच्यावर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला. युजरने लिहिले की, “जेव्हापासून आकाश चोप्रा समालोचक बनलाय, भारत कधीच विश्वचषक जिंकला नाही.”
India never won a cup since Aakash chopra became a commentator
— MK ZAIDI (@kashifzaidi49) June 15, 2023
हजरजबाबी उत्तर देण्यासाठी ओळखला जाणारा चोप्राही यावेळी शांत बसला नाही. त्याने या युजरला सडेतोड प्रत्युत्तर दिले. त्याने लिहिले की, “मी 2013च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये समालोचन केले होते. त्यानंतर आशिया चषकातही समालोचन केले होते. मात्र, मला तुमचं म्हणणं पटतंय. कोणाला तरी पराभवासाठी जबाबदार ठरवलेच पाहिजे. ही जबाबदारी मी घेतो.”
I commentated on the 2013 Champions Trophy. And Asia Cup after that. But I get your point. Somebody has to be blamed for the losses. I will take it ???? https://t.co/f9O8mwUNvh
— Aakash Chopra (@cricketaakash) June 15, 2023
भारताचा पराभव
भारतीय संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा पहिला डाव 296 धावांवर संपुष्टात आला. यानंतर ऑस्ट्रेलिया संघाने 8 विकेट्स गमावत 270 धावांवर दुसरा डाव घोषित केला. यावेळी भारताला विजयासाठी 444 धावांचे आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाचा डाव 234 धावांवरच संपुष्टात आला. यामुळे भारताने 10 वर्षांनंतर आयसीसी ट्रॉफी जिंकण्याची संधीही गमावली. (this former cricketer took the blame of wtc final defeat on himself read more)
महत्वाच्या बातम्या-
MPLच्या दुसऱ्या दिवशी रंगणार दोन सामन्यांचा थरार, वाचा कोण असणार आमने-सामने
ऋतुराजचे पाय धरण्यासाठी दोन चाहते मैदानात, सुरक्षारक्षकांनाही पळवलं, पाहा MPL मधील मजेदार व्हिडिओ