भारतात सध्या कोरोना व्हायरसचा मोठ्या प्रमाणावर प्रसार होत आहे. अशामध्ये भारत सरकारने ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. लॉकडाऊनमुळे खेळाडूंच्या दिनचर्येत बदल झाला आहे. यामध्ये भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेने कोविड-१९ च्या काळात त्याच्या दिनचर्येबद्दल सांगितले आहे.
बीसीसीआयने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून रहाणेचा (Ajinkya Rahane) व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो आपल्या पत्नीची मदत करताना दिसत आहे. तसेच रहाणे या व्हिडिओत म्हणाला की, “मी पुन्हा कराटेचा सराव (Karate Pracice) करण्यास सुरुवात केली आहे. कराटेमध्ये मी ब्लॅक बेल्ट मिळविला आहे. तसेच मी आठवड्यात ३-४वेळा कराटेचा सराव करण्याचा प्रयत्न करता आहे.”
Wondering what @ajinkyarahane88 is upto during the Lockdown????????? #StayHomeStaySafe #TeamIndia pic.twitter.com/6j6Dx8eu3c
— BCCI (@BCCI) April 11, 2020
“आर्या झोपेतून उठण्यापूर्वी तिच्याबरोबर कोणीतरी उठावे लागते. त्यामुळे मी तिच्याबरोबर उठतो. या काळात सर्वात सकारात्मक गोष्ट म्हणजे मला आर्याबरोबर (Aarya) सर्वाधिक वेळ घालवता येत आहे. त्याचबरोबर आर्या दुपारी झोपल्यानंतर मी पत्नी राधिकाला (Radhik Rahane) स्वयंपाकामध्ये मदत (Help in Cooking) करतो. आम्ही दोघांनीही आमची कामे वाटून घेतली आहेत,” असेही रहाणे या व्हिडिओत म्हणाला.
याबरोबरच पुढे तो म्हणाला की, “सध्या मला गाणी ऐकायला खूप आवडतात. तसेच मी वाचनही (Reading) करत आहे.”
ट्रेंडिंग घडामोडी-
-शेवटचे २ पर्याय, आयपीएलच्या आयोजनासाठी बीसीसीआयकडे केवळ हे पर्याय
-लॉकडाऊनचा परिणाम; या क्रिकेटपटूने चक्क त्याच्या पत्नीकडून कापून घेतले आपले केस
-माजी क्रिकेटपटू म्हणतोय, पवार साहेबांचं क्रिकेटमधील योगदान खूप मोठे






