---Advertisement---

नको तेच झालं! इंग्लंडच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय संघाचा डाव कोसळला अन् ‘तो’ नकोसा विक्रम झाला

On: बुधवार, ऑगस्ट 25, 2021 10:48 PM
---Advertisement---

इंग्लंड विरुद्ध भारत या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील दुसरा सामना लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानावर सुरू आहे.मालिकेतील पहिल्या दोन कसोटी सामन्यात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या भारतीय फलंदाजांकडून तिसऱ्या कसोटी सामन्यात देखील चांगल्या कामगिरीची अपेक्षा होती. परंतु भारतीय फलंदाज या डावात पूर्णपणे फ्लॉप ठरले आहेत.

भारतीय कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाजांचा टिकाव लागला नाही. हा निर्णय पूर्णपणे चुकीचा ठरला. भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. ही भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाविरुद्धची दुसरी सर्वात खराब कामगिरी आहे.

भारतीय संघाची निराशाजनक कामगिरी
तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय सलामीवीर फलंदाजांना साजेशी सुरुवात करून देण्यात अपयश आले होते. भारतीय संघाकडून रोहित शर्माने सर्वाधिक १९ आणि अजिंक्य रहाणेने १८ धावांचे योगदान दिले. इतर कुठल्याही फलंदाजाला साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते.भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ७८ धावांवर संपुष्टात आला. ही भारतीय संघाची कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाविरुद्धची दुसऱ्या क्रमांकाची सर्वात निचांकी धावसंख्या आहे.

यापूर्वी १९५२ मध्ये मॅनचेस्टरच्या मैदानावर भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात कसोटी सामना पार पडला होता. या सामन्यातील दुसऱ्या डावात भारतीय संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ५८ धावांवर संपुष्टात आला होता. ही भारतीय संघाची इंग्लंड संघाविरुद्धची सर्वात खराब कामगिरी होती. (This is India’s second lowest total against England in test cricket)

कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंड संघाविरुद्ध भारतीय संघाची निचांकी धावसंख्या
मॅनचेस्टर – (५८ धावा, १९५२)
लीड्स -(७८ धावा,२०२१)
मॅनचेस्टर- (८२ धावा,१९५२)

विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाची दुसऱ्यांदा निराशाजनक कामगिरी
विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने अनेक मोठ-मोठ्या मालिका आपल्या नावावर केल्या आहेत. परंतु, विराट कोहलीच्याच नेतृत्वाखाली भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा १०० पेक्षा कमी धावांवर सर्वबाद झाला आहे. पहिल्यांदा २०२०-२१ मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने भारतीय संघाला ३६ धावांवर सर्वबाद केले होते. त्यानंतर इंग्लंड संघाविरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघ अवघ्या ७८ धावांवर ऑलआऊट झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“जो रूट कारकिर्दीतील सर्वोत्तम लयीत, पण आमच्या पाठिब्यांची नितांत गरज आहे”

आता मैदानाबाहेर वाकयुद्ध, एका विधानावरुन गावसकर अन् नासिरमध्ये जुंपली

तिसऱ्या कसोटीपूर्वीच अँडरसनचा विराटशी पंगा, करुन दिली होती वाईट सरासरीची आठवण

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---