भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सध्या चालू असलेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या मालिकेत चमकदार कामगिरी करत आहे. मेलबर्न कसोटीत आपल्या फलंदाजीने महत्वाचे योगदान देणाऱ्या जडेजाने कालपासून सुरु झालेल्या सिडनी कसोटीत गोलंदाजी करताना पहिल्या डावात ४ बळी मिळवत छाप पाडली. मात्र याशिवाय त्याने आपल्या अचूक थ्रोने ऑस्ट्रेलियाचा शतकवीर स्टीव स्मिथला रन आउट देखील केले.
त्याच्या या शानदार क्षेत्ररक्षणाचे आता सर्वत्र कौतुक होत आहे. खुद्द जडेजाने देखील हा आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षण असल्याचे म्हंटले आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आभासी पत्रकार परिषदेत बोलताना जडेजाने हे विधान केले.
या रन आउटबाबत बोलताना जडेजा म्हणाला, “मी आत्तापर्यंत जे रन आउट केले आहेत, त्यातील हा सर्वोत्तम रन आउट आहे. मी या रन आउटला माझ्या कारकिर्दीतील सर्वोत्तम क्षणांमध्ये वरचे स्थान देईल.”
https://twitter.com/pavithran4/status/1347400810318098433?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1347400810318098433%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.india.com%2Fhindi-news%2Fsports-hindi%2Findia-vs-australia-this-is-my-best-best-run-out-so-far-says-ravindra-jadeja-on-steve-smith-run-out-4317142%2F
जडेजाने डीप स्क़्वेअर लेगवरुन अचूक थ्रो करत स्मिथला रन आउट केल्याने ऑस्ट्रेलियन संघाचा डाव ३३८ धावांवर संपुष्टात आला. ऑस्ट्रेलियाकडून स्मिथने सर्वाधिक १३१ धावा काढल्या. त्याच्या प्रत्युतरात फलंदाजीला उतरलेल्या भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाखेर २ बाद ९६ धावा केल्या असून ते अजूनही २४२ धावांनी पिछाडीवर आहेत. कर्णधार अजिंक्य रहाणे दिवसाखेर ५ धावांवर तर चेतेश्वर पुजारा ९ धावांवर नाबाद आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
‘या’ कसोटी फलंदाजांची नावे ऐकून गोलंदाजांचा उडतो थरकाप, काढल्यात खोऱ्याने धावा
वनडे, टी२० आणि कसोटीत ‘हा’ पराक्रम करणारा रोहित दुसराच, मग पहिलं नाव कुणाचं? वाचा
रोहित शर्माने लायनविरुद्ध मारलेला ‘तो’ षटकार ठरला ऐतिहासिक; पाहा काय आहे रेकॉर्ड