आयसीसीकडून (ICC) आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या क्रिकेटपटूंना प्रत्येक महिन्याला गौरवण्यात येते. आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ (ICC player of the month) पुरस्काराने महिन्याभरात चमकदार कामगिरी करणाऱ्या खेळाडूला सन्मानित केले जाते. परंतु, डिसेंबर महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कोणत्याच महिला खेळाडूला हा पुरस्कार दिला गेला नाही.
आयसीसीने २०२१ वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून खेळाडूंचा सन्मानित करण्यासाठी प्लेअर ऑफ द मंध हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली होती. परंतु, डिसेंबर २०२१ मध्ये या पुरस्कारात खंड पडला आहे. दरम्यान, ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा महिना संपल्यानंतर हा पुरस्कार एकाही महिला खेळाडूला दिला गेला नाही.
डिसेंबर महिन्यात क्रिकेटप्रेमींना अनेक थरारक सामने पाहायला मिळाले. मात्र, महिला क्रिकेटच्या दृष्टीने पाहिल्यास हे चित्र वेगळे होते. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यात अनेक महत्वाचे सामने आणि मालिका पार पडल्या. यामध्ये कसोटी, एकदिवसीय आणि टी२० अशा तिन्ही प्रकारच्या मालिकांचा समावेश होता. पण, महिला क्रिकेटमध्ये डिसेंबर २०२१ मध्ये एकही आंतरराष्ट्रीय कसोटी, एकदिवसीय किंवा टी२० मालिका खेळली गेली नाही. याच कारणास्तव एकाही महिला खेळाडूचे चांगले प्रदर्शन देखील पहाता आले नाही. याच कारणास्तव, डिसेंबर महिन्यातील आयसीसी महिला प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार देखील कोणत्या खेळाडूला पटकावता आला नाही.
पुरुषांच्या क्रिकेटचा विचार केला, तर न्यूझीलंडच्या एजाज पटेलला डिसेंबर २०२१ साठी आयसीसी प्लेअर ऑफ द मंथ पुरस्कार दिला गेला आहे. डिसेंबर महिन्यात भारत आणि न्याझीलंड यांच्यातील कसोटी मालिका पार पडली होती. यादरम्यान मुंबई कसोटीत एजाजने एका डावात भारताच्या १० विकेट्स घेण्याचा पराक्रम केला होता. ही किमया साधणारा एजाज इतिहासातील तिसरा खेळाडू ठरला. यापूर्वी दिग्गज जिम लेकर आणि अनिल कुंबळे यांनी कसोटीच्या एका डावात १० विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या डावात एजाजने चार विकेट्स घेतल्या होत्या.
डिसेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्क आणि भारताच्या मयंक अगरलवालला देखील या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते. मात्र, एजाजने त्यांना मागे टाकत हा पुरस्कार पटकावला.
महत्वाच्या बातम्या –
है तय्यार हम! अंडर-१९ विश्वचषकाच्या पहिल्या सराव सामन्यात यंग इंडियाची यजमान विंडीजवर दणदणीत मात
तमिल थलाइवाजाच्या यशाची मालिका सुरूच! हरियाणावर केली एकतर्फी सामन्यात मात
व्हिडिओ पाहा –