नॉटींगघम। इंग्लंड विरुद्ध भारत संघात ट्रेंटब्रिज मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडने मंगळवारी (21 आॅगस्ट) चौथ्या दिवसाखेर 9 बाद 311 धावा केल्या आहेत. या सामन्यात भारताला विजयासाठी 1 विकेटची तर इंग्लंडला 210 धावांची गरज आहे.
या सामन्यात कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी जरी जबरदस्त खेळी केल्या असतील तरी त्यांना मोठं योगदान दिलं ते यष्टीरक्षक रिषभ पंत आणि केएल राहुलने.
पंतने पहिल्या डावात ५ तर दुसऱ्या डावात २ झेल घेतले. तर केएल राहुलने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ४ झेल घेतले.
इंग्लंडच्या ज्या १९ विकेट्स गेल्या आहेत त्यात १४ वेळा या दोघांचा त्यात मोठा वाटा राहिला आहे.
यामुळे काही खास विक्रमही झाले आहेत. ते असे-
-इंग्लंमध्ये कसोटीत ७ झेल घेणारा केएल राहुल पहिलाच क्षेत्ररक्षक. आजपर्यंत इंग्लंडमध्ये ५१८ कसोटी सामने खेळवले गेले आहेत परंतु असा विक्रम झाला नव्हता.
-एकाच सामन्यात एकाच संघाच्या दोन खेळाडूंनी ६ किंवा त्यापेक्षा अधिक झेल घेण्याची ही कसोटी इतिहासातील पहिलीच वेळ होती.
-पदार्पणाच्या सामन्यात ७ झेल घेणारा रिषभ पंत हा पहिला भारतीय यष्टीरक्षक ठरला आहे. अन्य ४ भारतीय यष्टीरक्षकांनी ५ झेल घेतले आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–इंग्लड विरुद्ध भारत संघातील तिसऱ्या कसोटीत झाला हा खास विक्रम
–केरळच्या महापूरात कुटुंब अडकल्यानंतरही भारताच्या या जलतरणपटूची एशियन गेम्समध्ये चमकदार कामगिरी
–सर्व प्रश्नांचं उत्तर केवळ काळ देतो, रुट-कोहलीची ही आकडेवारी पाहुन कळेल नक्की कसे?






