---Advertisement---

‘खेळाडूंना बाकावर बसवण्यासाठी किंवा सुट्ट्यांसाठी निवडलं जात नाही’, प्रशिक्षक द्रविडचे वक्तव्य

On: गुरूवार, जुलै 29, 2021 1:40 PM
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका संघात सध्या मर्यादित षटकांच्या मालिका सुरू आहेत. या अगोदर भारतीय संघाने एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली होती. ही मालिका भारतीय संघाने २-१ ने जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघ आता टी२० सामन्यांची मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिला सामना भारतीय संघाने जिंकला आहे.

तर दुसऱ्या सामन्यात त्यांना श्रीलंकेकडून ४ विकेट्सने पराभव पत्करावा लागला आहे. तीन सामन्यांच्या या मालिकेत आता श्रीलंका संघाने भारतीय संघासोबत १-१ अशी बरोबरी केली आहे. या सामन्यापुर्वी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी संघ निवडीवर मोठे भाष्य केले होते.

परंतु या सामन्याच्या अगोदर भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू कृणाल पंड्याला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो संघातून बाहेर पडला असून त्याला विलगिकरणात ठेवण्यात आले आहे. त्याच बरोबर कृणालच्या संपर्कात आलेल्या ८ खेळाडूंची देखील चाचणी केली असून त्यांची चाचणी निगेटिव्ह आली आहे. तरी देखील त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे आता फक्त ११ खेळाडू बाकी राहिले होते. तेच खेळाडू दुसऱ्या टी२० सामन्यात श्रीलंका संघाविरुद्ध मैदानात उतरले होते.

या सामन्याच्या अगोदर संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड मजेशीर अंदाजात म्हणाले होते की, आम्हाला प्लेइंग इलेव्हन निवडण्यासाठी ११ खेळाडूच उरले आहेत. त्यामुळे हे सर्वच खेळाडू खेळणार आहेत. संघातील कोणताही खेळाडू कमी नसतो आणि तो पात्र असल्यामुळेच त्याची संघात निवड केली जाते, असे त्यांनी म्हटले आहे.

राहुल द्रविड म्हणाले की, ‘जेव्हा भारतीय संघाने एकदिवसीय मालिकेमध्ये २-० आघाडी घेतली होती. तेव्हा तिसऱ्या सामन्यामध्ये नवीन खेळाडूंना संधी दिली होती. परंतु येथे परिस्थितीमुळे टी२० मालिका जिंकण्याअगोदरच हा निर्णय घ्यावा लागला आहे. पण मला असं वाटतं की, जेव्हा तुम्ही भारतीय संघासाठी १५-२० खेळाडू निवडले जातात. तेव्हा त्यातील प्रत्येकजण प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्यास पात्र असतो. मला असे वाटत नाही की, निवडकर्त्यांनी खेळाडूंना फक्त बेंचवर बसण्यासाठी किंवा परदेशात जाऊन सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी निवडलेले असते.’

श्रीलंकेविरुद्धच्या दुसर्‍या टी२० सामन्यात भारताने ज्या ११ खेळाडूंना मैदानात उतरवले होते त्यापैकी ४ खेळाडूंनी या अगोदर टी२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले नव्हते. यामध्ये ऋतुराज गायकवाड, देवदत्त पडीक्कल, नितीश राणा, चेतन सकारिया यांचा समावेश होता.

या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर श्रीलंकेने पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून भारताविरुद्ध प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. कर्णधार शिखर धवनने ४० धावांची खेळी केली पण त्यासाठी त्याने ४२ चेंडूं खर्च केले. त्याचबरोबर पदार्पण करत असलेला ऋतुराज गायकवाड धवनबरोबर सलामीवीर फलंदाज म्हणून मैदानात उतरला. पण त्याने फक्त १८ चेंडूत २१ धावा काढल्या.

त्यानंतर देवदत्त पडिकक्कलने मैदानात आला त्याने देखील २९ धावा केल्या तर यासाठी त्याने २३ चेंडू खर्च केले. संजू सॅमसनने फक्त ७ धावा केल्या आणि तो देखील बाद झाला. तर नितीश राणासुद्धा ९ धावांवर बाद झाला. भारतीय संघाचे २० षटकांत ५ गडी बाद झाले होते तर १३२ धावा केल्या होत्या. अकिला धनंजयने या सामन्यात २ गडी बाद केले. तर लक्ष्याचा पाठलाग करत श्रीलंकेने १९.४ षटकांत ६ गडी बाद १३३ धावा करुन सामना जिंकला. त्याचबरोबर धनंजय डी सिल्वा ३४ चेंडूंत ४० धावा काढून नाबाद राहिला आणि ‘सामनावीर’चा पुरस्कार देखील मिळवला.

महत्त्वाच्या बातम्या-

आधीच धक्के बसलेल्या टीम धवनसाठी वाईट बातमी! ‘हा’ खेळाडू तिसऱ्या टी२०तून होऊ शकतो बाहेर

अव्वल फिरकीपटू असो वा वेगवान गोलंदाज, ‘या’ ३ फलंदाजांनी प्रतिस्पर्धींना सदैव चोप दिला

धावत्या रेल्वेत रंगला हिंदी शिकवणीचा क्लास, भारतीय फलंदाज जेमिमाने विदेशी मैत्रिणींना दिले धडे

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---