भारत आणि पाकिस्तान यांच्यात शनिवारी (2 सप्टेंबर) लढत झाली. आशिया चषक 2023मध्ये भारताचा हा पहिला, तर पाकिस्तानचा दुसरा सामना ठरला. चाहते मागच्या मोठ्या काळापासून या सामन्याची वाट पाहत होते. मात्र, पावसाने चाहत्यांची मजा खराब केली. पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे पंचांनी सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तान संघाने भारतीय फलंदाजांना झटपट बाद करण्यात यश मिळवले. याच पार्श्वभूमीवर त्यांचा वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदी याची खास प्रतिक्रियाही समोर आली.
शाहीन आफ्रिदी पाकिस्तानसाठी या सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. वेगवान गोलंदाजाने 10 षटकांमध्ये अवघ्या 35 धावा खर्च करून सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या विकेट्सही होत्या. शाहीन आफ्रिदीच्या याच भेदक गोलंदाजीमुळे भारतीय संघ डावाच्या सुरुवाताल अडचणीत आला होता. भारताची धावसंख्या 66 असताना चार महत्वाच्या फलंदाजांनी विकेट्स गमावल्या होत्या. ईशान शर्मा आणि हार्दिक पंड्या यांनी या सामन्यात महत्वपूर्ण धावांचे योगदान दिले. पण पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताला 266 धावांवर सर्वबाद केले. विशेष म्हणजे या सर्व विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या.
भारतीय संघ 48.5 षटकात सर्वबाद झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीने पाकिस्तान संघाची रणनीती कारगर ठरली. भारताचा डाव संपल्यानंतर शाहीन आफ्रिदी म्हणाला, “नवीन चेंडूसह आमची हीच रणनीती होती की. दोन्ही विकेट्स (रोहित आणि विराट) महत्वाच्या होत्या. माझ्यासाठी हे दोन्ही फलंदाज समान आहेत. पण रोहितची विकेट घेतल्यानंतर जास्त चांगले वाटले. आम्हा वेगवान गोलंदाजांची रणनीती कामी आली.”
“नसीमने 150 ताशी किमी गतीने गोलंदाजी केली, ज्यामुळे मी खरोखर आनंदी होतो. नवीन चेंडू याठिकाणी स्विंग आणि सीम होत होता, पण त्यापेक्षा जास्त काही फायदा मिळत नव्हता. चेंडू एकदा जुना झाल्यानंतर धावा करणे सोपे झाले असते,” असेही शाहीन पुढे म्हणाला. दरम्यान, सामन्याचा विचार केला, तर पावसामुळे पाकिस्तानचा डाव सुरू होऊ शकला नाही. सामना रद्द झाल्यानंतर दोन्ही संघांना प्रत्येकी एक-एक गुण वाटून दिला गेला आहे. (‘This is what we wanted to do with the new ball’, what Shaheen Afridi said after taking the wicket of Rohit-Virat)
महत्वाच्या बातम्या –
ईशानने पाकिस्तानविरुद्ध कारकिर्दीत पहिल्याच वनडेत ठोकल्या 82 धावा, नावावर खास विक्रमाची नोंद
चल नीघ! हॅरिस रौफने ईशानला दाखवली खुन्नस! यष्टीरक्षक फलंदाज शतक करण्यात अपयशी