भारतीय क्रिकेटमध्ये जोड्यांबद्दल बोलायचं झालं, तर अनेक जोड्या फेमस आहेत. जसे की, सौरव- सचिन, सेहवाग- गंभीर, अश्विन- जडेजा आणि अनेक बऱ्याच आजी- माजी खेळाडूंच्या जोड्या प्रसिद्ध आहेत. एक जोडी चाहते कधीच विसरणार नाहीत. कदाचित झोपेतून उठवून जरी त्या जोडीबद्दल विचारले, तर ते लगेच सांगतील. ती जोडी म्हणजे, २००५ मधील धोनी- युवराज या दोन शिलेदारांची.
हे दोन शिलेदार जेव्हाही भारतीय संघाकडून मैदानावर खेळत असायचे, तेव्हा विरोधी संघाला पुरता घाम फुटल्याशिवाय राहत नाही. २८ वर्षांनंतर या दोघांच्या जोडीने भारतीय संघाला २०११ चा विश्वचषक जिंकून दिला होती. त्याचबरोबर या दोघांची जोडी धोनीच्या आयुष्यावर आधारित बनविलेला चित्रपट ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ यामध्येही दाखविण्यात आली होती.
जर आपण ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ हा चित्रपट पाहिला असेल, तर नक्कीच त्या व्यक्तीबद्दल ऐकले असेल, ज्याने या चित्रपटात धोनीची भूमिका साकारली होती. धोनीच्या भूमिकेत होता सुपरस्टार सुशांत सिंग राजपूत (Sushant Singh Rajput). परंतु या चित्रपटात आणखी एका भूमिकेने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आपसुकच खेचले होते, तो होता अभिनेता हेरी तंग्री (Herry Tangri). हा तोच अभिनेता होता ज्याने युवराज सिंगची (Yuvraj Singh) भूमिका साकारली होती.
युवराजप्रमाणे दिसण्यासाठी हेरी तंगरीने घेतली कठोर मेहनत
अभिनेता हॅरीने ‘एमएस धोनी- द अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात युवराजप्रमाणे दिसण्यासाठी कठोर मेहनत घेतली होती. त्यासाठी त्याने आपले वजन तब्बल १५ किलो कमी केले होते. या चित्रपटात त्याचे कामाने सर्वांनाच आश्चर्यचकित केले. विशेष म्हणजे तो हुबेहुब युवराज सिंगप्रमाणे दिसत होता.
‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातही हेरीने केलंय काम
यापूर्वी हेरी ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातही दिसला होता. त्यासाठी त्याने तब्बल १२ किलो वजन वाढविले होते. या चित्रपटातील ‘हवन करेंगे- हवन करेंगे’ या गाण्यात जो सरदार होता, तो इतर कोणीही नसून हेरी होता.
युवराजच्या भूमिकेसाठी हॅरीचे ऑडिशनदेखील घेतले नाही
चित्रपटाचे दिग्दर्शक नीरज पांडे यांनी युवराजच्या भूमिकेसाठी हेरीचे ऑडिशनही घेतले नव्हते. त्यांनी फक्त हॅरीला पाहिले आणि त्याला कायम केले. त्याबद्दल हेरी म्हणतो, त्यालाही क्रिकेट खेळणे खूप पसंत आहे आणि त्याची खेळण्याची पद्धत ही हुबेहुब युवराजप्रमाणे आहे. शालेयवयात हॅरी जिल्हा स्तरावरील क्रिकेटपटू राहिला आहे. तरीही त्यानंतर तो व्हॉलीबॉलकडे वळला. परंतु तो म्हणतो की आजही त्याला क्रिकेट खेळणे अतिशय आवडते.
एवढं असूनही युवराज सिंगला मात्र कधी भेटता नाही आले
युवराज सिंगबद्दल समजून घेण्यासाठी हेरीने युवराजच्या मुलाखतीचे आणि इतर काही व्हिडिओ यूट्यूबवर खूप पाहून आपली भूमिकेला न्याय देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. त्याची भेट मात्र युवराजशी कधीच झाली नाही. परंतु युवराजचे वडील योगराज सिंग यांची हेरीने भेट घेतली आहे. खरंतर योगराज सिंग आणि हेरीने ‘भाग मिल्खा भाग’ मध्ये एकत्र काम केले आहे.
हेरीने आतापर्यंत ‘लव्ह सेक्स और धोखा’ (२०१०), ‘टर्निंग ३०!!!’ (२०११), ‘मौसम’ (२०११), ‘लव्ह शव ते चिकेन खुराना’ (२०१२), ‘भाग मिल्खा भाग’ (२०१३) आणि ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ अशा चित्रपटांमध्ये काम केले आहे.
ट्रेंडिंग घडामोडी-
-टिममेट्सकडून आदर्श घेत ‘या’ खेळाडूने केले तब्बल १२ किलो वजन कमी
-वाढदिवसाला गांगुलीला घरी मिळाले ६० केक, दिलदार गांगुलीने काय केले पहाच
-भूत पाहून सौरव गांगुलीचीही टरकली! फायरब्रिगेडला बोलवलं थेट घरी