यावर्षी म्हणजेच 2023मध्ये होणाऱ्या आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला देण्यात आले होते. मात्र, बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये सामने खेळण्यास स्पष्ट नकार दिला होता. यानंतर आता कोणत्या देशात स्पर्धेचे आयोजन होणार, याबाबत चर्चा सुरू आहेत. अशात माध्यमांतील वृत्तांनुसार, पाकिस्तानने पाकिस्तान आणि श्रीलंका देशात स्पर्धेचे आयोजन होण्याचा प्रस्ताव स्वीकारला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तानच्या एका क्रिकेटपटूने अचानक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
कोण आहे क्रिकेटपटू?
खरं तर, निवृत्ती घेणारी क्रिकेटपटू पाकिस्तान महिला संघाची फलंदाज नाहिदा खान (Nahida Khan) आहे. तिने 14 वर्षांच्या दीर्घ कारकीर्दीला पूर्णविराम लावत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. नाहिदाने 7 फेब्रुवारी, 2009 रोजी श्रीलंकेविरुद्ध बोगरा, बांगलादेश येथे वनडे पदार्पण केले होते. खरं तर, नाहिदा ही पाकिस्तानचे प्रतिनिधित्व करणारी बलूचिस्तानची एकमेव महिला क्रिकेटपटू आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ट्वीट करत याची माहिती दिली आहे.
.@nahidakhan_real, who represented Pakistan in three ODI World Cups and four T20 World Cups, has announced her retirement from international cricket.
Congratulations on a 14-year career for Pakistan ????
Read more ➡️ https://t.co/RAuXMbNAWt pic.twitter.com/Il4kXOU43e
— Pakistan Cricket (@TheRealPCB) June 15, 2023
काय म्हणाली नाहिदा?
नाहिदा खान निवृत्ती (Nahida Khan Retirement) घेण्याविषयी म्हणाली की, “मी माझ्या संपूर्ण कारकीर्दीत मिळालेल्या पाठिंब्यासाठी आभारी आहे. मी माझे कुटुंब, संघसहकारी, प्रशिक्षक आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला त्यांच्या मार्गदर्शन आणि माझ्या क्षमतांवर विश्वास ठेवण्यासाठी धन्यवाद देऊ इच्छिते. मी फक्त पाकिस्तानच नाही, तर जगभरातील त्या चाहत्यांनाही धन्यवाद देऊ इच्छिते, ज्यांना नेहमी मला पाठिंबा दिला.”
देशासाठी खेळले 7 विश्वचषक
विशेष म्हणजे, नाहिदा खान ही 3 वनडे विश्वचषक आणि 4 आंतरराष्ट्रीय टी20 विश्वचषकात पाकिस्तान महिला क्रिकेट संघाचा भाग होती. ती 2013, 2017 आणि 2022मध्ये वनडे विश्वचषकाचा भाग होती. तसेच, टी20 विश्वचषक खेळताना तिने 2012, 2014, 2016 आणि 2018 यादरम्यान संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. नाहिदाने नुकतेच कराचीमध्ये आयोजित केलेल्या पाकिस्तान चषक महिला क्रिकेट स्पर्धेत ब्लास्टर्सच्या सहाय्यक प्रशिक्षकाच्या रूपात काम करून प्रशिक्षणाच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे.
अशी आहे कारकीर्द
नाहिदाने 120 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये पाकिस्तान महिला संघाचे प्रतिनिधित्व केले. यामध्ये तिने बॅटमधून एकूण 2014 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना 1 विकेटही घेतली. नाहिदाने 2018मध्ये दांबुला येथे श्रीलंकेवर पाकिस्तानच्या 94 धावांच्या विजयात 4 झेल घेत वनडे डावात सर्वाधिक झेल घेण्याचा विक्रमही रचला. (this pakistan women cricketer retires from international cricket she played 7 world cups for pak)
महत्वाच्या बातम्या-
दिमाखदार सोहळ्यासह MPL 2023 ची सुरुवात, अमृता खानविलकरच्या परफॉर्मन्सने चाहते मंत्रमुग्ध
MPL 2023: उद्घाटनाच्या सामन्यात पुणेरी बाप्पाचा दणदणीत विजय, ऋतुराजचे वादळी अर्धशतक, कोल्हापूर पराभूत