भारत आणि पाकिस्तान हे क्रिकेटच्या मैदानावरील सर्वात कट्टर वैरी. भलेही मागील काही वर्षांपासून हे संघ एकमेकांविरुद्ध खूप कमी खेळतात. परंतु एकमेकांविषयी वक्तव्ये करणे, टिका करणे, जुन्या गोष्टींची खुन्नस काढणे किंवा कौतुक करणे, अशा गोष्टी चालूच असतात. नुकतेच पाकिस्तानचे माजी खेळाडू इमाम उल हक यांनी भारतीय खेळाडूंबद्दल आपले मत व्यक्त केले आहे. त्यांनी भारतीय आणि पाकिस्तानी क्रिकेटपटूंना मिळणारे मानधन, आयपीएल, भारतीय संघाचे भरघोस यश अशा गोष्टींवर ते बोलत होते.
इमाम म्हणाले की, “क्रिकेटच्या जीवनामध्ये पैसा खूप महत्त्वाचा असतो. जर एखाद्या खेळाडूला चांगले पैसे मिळत असतील; तर त्याचा आत्मविश्वास वाढतो. आत्मविश्वास वाढला की तो मानसिकदृष्ट्याही खंबीर होतो. आमचे दुर्दैव आहे की, भारताप्रमाणे आम्हाला मानधन मिळत नाही. जेव्हा एखादा खेळाडू पीएसएलमध्ये सामने खेळत असेल. तर त्याला भीती वाटत राहते की, जर आपण उत्कृष्ट प्रदर्शन नाही केले. तर आपल्याला संघातून बाहेर काढतील किंवा आपल्याला पाकिस्तानसाठी पुन्हा प्रदर्शन करता येणार नाही.”
इमाम उल हक पुढे म्हणाले की, “याच कारणामुळे आमचे खेळाडू स्वतःभोवती एक कवच निर्माण करतात. त्याच्याबाहेर जाऊन ते कधी खेळतही नाहीत. त्यामुळे नवीन येणारे खेळाडू संघर्ष करून पुढे जातात. आपल्यापैकी बरेचजण विचारतात की, आपण इतके असक्षम का आहोत? कारण आमचा संघच असक्षम आहे. संघाला सातत्याने बदल करण्याची गरज आहे. जर दर तिसऱ्या सामन्यानंतर फलंदाजीतील क्रम बदलत असेल; तर तुम्ही कशी अपेक्षा करू शकता की संघ नियमितमध्ये 350 धावांचे लक्ष्य गाठू शकता.”
“ईयोन मोर्गन आणि विराट कोहली यांसारख्या दिग्गज खेळाडूंकडून मी जाणून घ्यायचा प्रयत्न करतो कि, त्यांचा संघ इतका यशस्वी कसा आहे? कसे ते यामध्ये सातत्य राखून आहेत? विराट कोहली आणि ईयोन मोर्गन हे पांढऱ्या चेंडू क्रिकेटमध्ये सर्वात यशस्वी कर्णधार आहेत. मला त्यांच्याकडून समजले की, त्यांना आणि खेळाडूंना स्वतःला सिद्ध करण्याची पुरेपूर संधी दिली जाते. माझ्या मते आम्ही इथेच मागे पडत आहोत. आमच्याही खेळांमध्ये सातत्यता राहिली, तर आम्ही एक दिवस स्वतःला सिद्ध करून दाखवू. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आम्ही 330 धावांचे लक्ष्य गाठू शकलो. कारण तेव्हा आमच्या संघामध्ये सातत्य टिकून होते,” असे त्यांनी पुढे सांगितले.
आयपीएलमुळे भारतीय खेळाडूमध्ये खूप मोठा बदल झाला
अन्य खेळाडूंप्रमाणेच इमाम यांनाही मान्य आहे की, आयपीएलमुळे भारतीय संघ आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करत आहे. “आयपीएल खेळत असल्यामुळे भारतीय खेळाडूंना वेगवेगळ्या गोलंदाजांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांना मानसिकरित्या कोणताही दबाव पडत नाही. ते सहज गोलंदाजांचा सामना करू शकतात. परंतु पाकिस्तानी खेळाडूंना घरच्या मैदानावरून थेट राष्ट्रीय संघासाठी खेळण्याची संधी दिली जाते. त्यामुळे खेळामध्ये सातत्य नसल्यामुळे उत्कृष्ट कामगिरी करू शकत नाहीत,” असे ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या-
जबरदस्त हिम्मत! ज्या कारणामुळे संघाबाहेर झाला, चुरशीच्या टी२० विश्वचषकात त्यातच आजमावणार हात
“विराटने आम्हाला सांगितलंय, कसोटी चॅम्पियनशीप एक महिन्याची नव्हे २ वर्षांची मेहनत”
अनुष्काच्या कॉफीवरुन टीका, पण ऑस्ट्रेलियामध्ये जिंकल्यावर कौतुक नाही- माजी निवडकर्ता