जगात अनेक श्रीमंत क्रिकेटपटू आहेत. त्यात भारताच्या सचिन तेंडुलकर, एमएस धोनी आणि विराट कोहली यांची नावे आघाडीवर आहेत. मात्र, तुम्हाला माहितीये की, पाकिस्तान क्रिकेट संघाचा एक खेळाडूची संपत्ती ही विराटच्या संपत्तीच्या निम्मीदेखील नाहीये. चला तर, कोण आहे तो खेळाडू जाणून घेऊयात…
पाकिस्तानच्या सर्वात श्रीमंत सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये बाबर आझम (Babar Azam) याच्या नावाचा समावेश होतो. त्याची एकूण संपत्ती 30 कोटी आहे. असे असले, तरीही एकूण क्रिकेटपटूंमध्ये तो सर्वाधिक श्रीमंत क्रिकेटपटू नाहीये. खरं तर, पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत क्रिकेटपटू (Richest Pakistani Cricketer) हे माजी कर्णधार इम्रान खान (Imran Khan) आहेत. इम्रान खान यांची गणना पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंमध्ये होते. त्यांच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषकही जिंकला आहे. एका रिपोर्टनुसार, इम्रान खान यांची नेटवर्थ 10.2 बिलियन (पाकिस्तानी रुपये) आहे. ही रक्कम भारतीय रुपयांमध्ये जवळपास 290 कोटी रुपये इतकी आहे.
इम्रान खान यांची सर्वाधिक कमाई ब्रँड एंडॉर्समेंटमार्फत होते. मात्र, त्यांनी क्रिकेटमधूनही भरपूर पैसा कमावला आहे. विशेष म्हणजे, इम्रान खान हे पाकिस्तानचे पंतप्रधानही राहिले आहेत. ते पाकिस्तानचे 22वे पंतप्रधान होते. ते 2018 ते 2022 दरम्यान 4 वर्षे या पदावर होते. इम्रान पाकिस्तानच्या सर्वात प्रसिद्ध राजकीय पक्ष तहरीक ए इन्साफचे संस्थापक अध्यक्ष आहेत.
विराटच्या निम्म्या संपत्तीपेक्षा कमी संपत्ती
असे असले, तरीही इम्रान खान यांची एकूण संपत्ती ही भारताचा श्रीमंत क्रिकेटपटू विराट कोहली याच्या निम्म्या संपत्तीपेक्षाही कमी आहे. इम्रान खान यांची संपत्ती 290 कोटी रुपये (Imran Khan 290 Crore Net Worth) आहे, तर भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली याची संपत्ती 1050 कोटी रुपये आहे. विराटची गणना जगातील श्रीमंत क्रिकेटपटूंमध्ये होते.
इम्रान खान जामीनावर बाहेर
इम्रान खान यांच्याविषयी बोलायचं झालं, तर ते तोशाखाना वादात अडकले असून ते सध्या जामीनावर बाहेर आहेत. (this pakistans richest cricketer net worth less than half of virat kohli know here)
महत्त्वाच्या बातम्या-
‘इज्जत वाचली पाहिजे बास…’, भारतीय संघाच्या मियामीतील व्हिडिओवर नेटकऱ्याची लक्षवेधी कमेंट
इंग्लंडच्या भूमीत तळपली पृथ्वी शॉची बॅट! वादळी द्विशतक ठोकत उद्ध्वस्त केले मोठे रेकॉर्ड्स