---Advertisement---

‘या’ खेळाडू मध्ये दिसते कोहली-रोहितची झलक!बटलरच्या विधानाने खळबळ

On: गुरूवार, जून 19, 2025 2:24 PM
---Advertisement---

इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी शुबमन गिलला भारतीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. त्यानंतर तो सतत चर्चेत आहे. काही लोकांना ही निवड आवडली तर काही लोक यावरती टीका देखील करत आहेत. इंग्लंड क्रिकेट संघाचा स्टार फलंदाज जोस बटलरनेही या तरुण फलंदाजावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. गिल हा टीम इंडियासाठी माजी कसोटी आणि टी-20 कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचे मिश्रण असल्याचे सिद्ध होईल असा त्यांचा विश्वास आहे.

अनुभवी फलंदाज रोहित शर्माने नुकतीच निवृत्ती जाहीर केल्यानंतर,शुबमन गिलला कसोटी क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. क्रिकेटचे भविष्य लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे निवडकर्त्यांचे मत आहे. गिल हा एक तरुण खेळाडू आहे. तो भारतीय संघाला एक पाऊल पुढे घेऊन जाण्यात यशस्वी ठरेल. त्याच्याशिवाय, संघाच्या उपकर्णधारपदाची जबाबदारी विकेटकीपर फलंदाज रिषभ पंतवर सोपवण्यात आली आहे.

शुबमन गिलच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल सांगायचे तर देशासाठी 32 कसोटी, 55 एकदिवसीय आणि 21 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. दरम्यान, त्याने 59 कसोटी डावांमध्ये 35.06 च्या सरासरीने 1893 धावा, 55 एकदिवसीय डावांमध्ये 59.04 च्या सरासरीने 2775 आणि 21 टी-20 डावांमध्ये 30.42 च्या सरासरीने 578 धावा केल्या आहेत.

गिलने कसोटी क्रिकेटमध्ये पाच शतके आणि सात अर्धशतके, एकदिवसीय सामन्यात एक द्विशतक, आठ शतके आणि 15 अर्धशतके आणि टी-20 मध्ये एक शतक आणि तीन अर्धशतके झळकावली आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---