क्रिकेट सामन्यात अनेकदा काही वेळा असे निर्णय दिले जातात, ज्यांची चर्चा झाल्याशिवाय राहत नाही. असेच काहीसे आता विश्वचषक 2023 स्पर्धेतील 37व्या सामन्यात पाहायला मिळाले. या सामन्यात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघ या सामन्यात आमने-सामने आहेत. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. यावेळी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला उतरलेल्या विराट कोहली याबाबतच्या एका निर्णयावरून चाहत्याने नाराजी व्यक्त केली.
नेमकं काय घडलं?
झालं असं की, भारतीय डावातील 21वे षटक टाकण्यासाठी केशव महाराज आला होता. यावेळी स्ट्राईकवर विराट कोहली होता. महाराजने पहिला चेंडू टाकताच विराटच्या बॅटला चकवत यष्टीरक्षक क्विंटन डी कॉक याच्या हातात गेला. यावेळी यष्टीरक्षक आणि गोलंदाज दोघांनीही अपील केली. तसेच, कर्णधार टेम्बा बावुमा (Temba Bavuma) यानेही रिव्ह्यू घेतला. तिसऱ्या पंचांनी अल्ट्राएज तपासला, पण त्यात चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नसल्याचे समोर आले. त्यामुळे विराट नाबाद राहिला. यादरम्यान विराटने दक्षिण आफ्रिका संघाच्या खेळाडूंशी हसत संवाद साधला. नाबाद निर्णय आल्यानंतर विराटने विराटने हसत डी कॉकशीही संवाद साधला.
चाहत्याचा संताप
मात्र, एका चाहत्याने रिव्ह्यूचे दोन्ही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पहिल्या ट्वीटमध्ये चाहत्याने संताप व्यक्त करत म्हटले की, “हे काय आहे? अल्ट्राएजमध्ये स्पाईक का दाखवत आहे?”
https://twitter.com/HaroonM33120350/status/1721108313750786534
यानंतर आणखी एक ट्वीट करत चाहत्याने आरोप लावला की, “अल्ट्रएज स्पाईक का दाखवत नाही? बीसीसीआयने चांगली खेळी केली. ही स्पर्धा विकली गेली आहे.”
https://twitter.com/HaroonM33120350/status/1721109200334475508
आता या चाहत्याचे ट्वीट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच, यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत असून युजर्स त्याला ट्रोलही करत आहेत. एकाने असेही म्हटले आहे की, “तू मोठ्या स्क्रीनवर पाहत जा.”
भारत 200च्या पार
भारतीय संघाने 34व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर श्रेयस अय्यर याच्या बॅटमधून निघालेल्या एक धावेसह 200 धावांचा टप्पा पार केला. यावेळी विराटने 75 चेंडूत 56, तर श्रेयस अय्यरने 76 चेंडूत 62 धावांचे योगदान दिले होते. (This tournament sold out fan criticized After virat kohli not out decision)
हेही वाचा-
फखर जमानच्या झंझावाती शतकाने पीसीबी अध्यक्ष खूश, केलं ‘एवढ्या’ लाखांचं बक्षीस जाहीर
CWC 23: भारताला पहिला धक्का! जबरदस्त सुरुवात करून देणाऱ्या रोहितची रबाडाने काढली विकेट