क्रिकेट विश्वात अनेक खेळाडूंनी क्रिकेटशिवाय इतर क्षेत्रातही काम करताना पाहायला मिळतात. अशाच प्रकारे आता श्रीलंकेचा 30 वर्षीय अष्टपैलू क्रिकेटपटू थिसारा परेराने (Thisara Perera) श्रीलंकेच्या सैन्यात गाजाबा रेजिमेंटमध्ये ‘मेजर’ हे पद स्विकारले आहे.
याची माहिती परेराने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.
I accepted the invitation of Army Commander Lieutenant general Shavendra Silva in the first place & joined the Army.Getting an invitation from someone like him was one of the biggest achievements of my life. Thank you Sir! I look forward to contributing my best to Army Cricket. pic.twitter.com/yfTFHANE1O
— Thisara perera (@PereraThisara) December 30, 2019
तो म्हणाला की, लष्कराचे लेफ्टनंट जनरल शवेंद्र सिल्वा (Lieutenant General Shavendra Silva) यांच्या आमंत्रणावर तो सैन्यात सामील झाला आहे.
परेराला गाजाबा रेजिमेंटमध्ये मेजर या पदावर नियुक्त करण्यात आले आहे. त्याचे हे पद मानद प्रकारातील आहे.
यापूर्वी श्रीलंकेचा माजी कर्णधार दिनेश चंदीमलदेखील (Dinesh Chandimal) श्रीलंकेच्या सैन्यात सामील झाला होता. त्याने लष्कर क्रिकेट संघाकडून खेळण्यासाठी हा प्रस्ताव स्विकारला होता.
परेराने श्रीलंकेकडून आतापर्यंत 6 कसोटी सामने, 161 वनडे आणि 79 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 203, 2210 आणि 1169 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने या तिन्ही क्रिकेट प्रकारात अनुक्रमे 11, 171 आणि 51 विकेट्स घेतले आहेत.
आयपीएल २०२०साठी राजस्थान रॉयल्समध्ये इश सोधीचा समावेश, पण खेळाडू म्हणून नाही तर…
वाचा????https://t.co/yvKrT079OB????#म #मराठी #Cricket @rajasthanroyals @ish_sodhi— Maha Sports (@Maha_Sports) January 2, 2020
हार्दिक पंड्या एंगेज्ड झालेला पाहून विराट कोहलीला बसला धक्का, म्हणाला…
वाचा????https://t.co/zAunDDnXIS????#म #मराठी #Cricket #HardikPandya @imVkohli @hardikpandya7— Maha Sports (@Maha_Sports) January 2, 2020