---Advertisement---

भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये ‘या’ तिघांचा समावेश झाला तर ‘मिशन इंग्लंड’ होणार फत्ते

On: शनिवार, जून 26, 2021 4:22 PM
---Advertisement---

जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडकडून भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोर लागला. त्यानंतर, आता भारतीय संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडच्या संघाशी सामना करेल. भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची कसोटी मालिका ४ ऑगस्टपासून सुरू होईल.

या कसोटी मालिकेदरम्यान, जर या ३ भारतीय खेळाडूंना प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली तर, भारतीय संघ इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर पराभूत करू शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच ३ खेळाडूंबद्दल सांगणार आहोत, ज्यांचा इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करणे आवश्यक आहे.

१) मयंक अगरवाल-
युवा सलामीवीर शुबमन गिलला वारंवार संधी दिल्यानंतरही कसोटी सामन्यांमध्ये तो आपली छाप पाडू शकला नाही. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात तो २८ व ८ धावा काढण्याचा यशस्वी ठरला होता. रोहित शर्मासोबत मिळून त्याला भारतीय संघाला चांगली सुरुवात देता आली नाही.

इंग्लंड विरुद्ध आगामी कसोटी मालिकेत त्याच्या जागी मयंक अगरवालला संधी दिली जाऊ शकते. मयंकने आपल्या लहानशा कारकिर्दीत अनेक महत्त्वपूर्ण खेळ्या केल्या आहेत. त्याने आत्तापर्यंत भारताचे १४ कसोटी सामन्यात प्रतिनिधित्व करताना ४५.७३ च्या सरासरीने १०५२ धावा बनवल्या आहेत.

२) शार्दुल ठाकूर
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात अष्टपैलू म्हणून संधी देण्यात आलेला रवींद्र जडेजा याने या सामन्यात सर्वांची निराशा केली. तो फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये सपशेल अपयशी ठरला. दोन्ही डावात मिळून त्याला केवळ एक बळी मिळवता आला. तर फलंदाजीमध्ये, तो संघाची मदत करू शकला नाही.

जडेजा अपयशी ठरल्याने त्याच्याजागी मध्यमगती वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर याला संधी मिळू शकते. शार्दुल हा स्विंग गोलंदाज तसेच उपयुक्त फलंदाज म्हणून ओळखला जातो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ब्रिस्बेन कसोटी जिंकून देण्यात त्याचा मोलाचा वाटा होता.

३) मोहम्मद सिराज
टी२० क्रिकेटमध्ये भारताचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज असलेल्या जसप्रीत बुमराह याला जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एकही बळी मिळवता आला नाही. त्यामुळे, इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याच्या जागी युवा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याला संधी देण्यात येऊ शकते. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर तसेच, इंग्लंडविरुद्ध मायदेशात झालेल्या मालिकेत त्याने उत्तम कामगिरी बजावली होती.

महत्त्वाच्या बातम्या – 

धोक्याची घंटा! टी२० विश्वचषकासाठी त्या खेळाडूंना ऑस्ट्रेलियन संघात स्थान मिळणे कठीण, फिंचने दिला इशारा

बायको असावी तर अशी! बुमराहसाठी पत्नी संजनाने बनवले ‘रोमँटिक जेवण’, फोटो होतोय व्हायरल

कसोटी अजिंक्यपदमध्ये हॅट्रिक घेणारे गोलंदाज, अंतिम सामन्यात फ्लॉप ठरलेल्या बुमराहचाही समावेश

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---