भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह मागच्या मोठ्या काळापासून दुखापतीचा सामना करत आहेत. दुखापतीमुळे बुमराह क्रिकेटच्या मैदानात दुरू आहे, पण आयपीएल 2023 पूर्वी तो फिटनेस मिळवून मुंबई इंडियन्ससाठी सज्ज असेल, असे बोलले जात होते. पण ताज्या माहितीनुसार बुमराह आगामी आयपीएल आणि जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या अंतिम सामन्यात खेळणार नाहीये. अशात मुंबई इंडियन्सला आघामी आयपीएल हंगामासाठी बुमराहची जागा भरून काढण्यासाठी त्याच्या तोडीचा वेगावन गोलंदाज संघात हवा असेल. आपण या लेखात तीन अशा वेगवान गोलंदाजांवर नजर टाकणार आहोत, जे आगामी आयपीएल हंगामात बुमराहजी जागा भरू शकतात.
जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah ) दुखापतीमुळे आगामी आयपीएल खेळणार नसला, तरी इंग्लंडचा दिग्गज जोफ्रा आर्चर (Jofra Archer) आयपीएल 2023 (IPL 2023) साठी पूर्णवेळ उपस्थित असणार आहे. आर्चरचे जरी संघात आघमन झाले, तरी बुमराहची कमी भरण्यासाठी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघाला अजून एक भेदक वेगवान गोलंदाज संघात हवा आसेल.
धवल कुलकर्णी
जसप्रीत बुमराहच्या जागी मुंबई इंडियन्स ज्या खेळाडूवर सर्वात पहिली बोली लावू इच्छित असले, तो म्हणजे अनुभवी धवल कुलकर्णी (Dhawal Kulkarni). 34 वर्षीय वेगवान गोलंदाजाला आयपीएलमध्ये खेळण्याचा मोठा अनुभव आहे. पण तरीदेखील मागच्या दोन हंगामांमध्ये त्याला खरेदी करण्यासाठी कोणताच आयपीएल हंग पुढे सरसावला नाही. आयपीएल 2022 मध्ये धवल समालोचकाच्या भूमिकेतही दिसला होता.
आयपीएल 2008 पासून आयपीएल 2021 पूर्व धवन मुंभई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात लायन्स, राजस्थान रॉयल्स, या संघासाठी खेळला आहे. यादरम्यानच्या काळात त्याने 92 आयपीएल सामने खेळले असून यात 86 विकेट्स घेतल्या. आयपीएल 2016 हे त्याच्यासाठी सर्वोत्तम राहिले होते. या हंगामातील 14 सामन्यांमध्ये धवलने 18 विकेट्स घेतल्या होत्या. आयपीएलमध्ये खेळण्याचा अनुभव आणि मुंबईतील केळपट्टीची जाण असल्यामुळे कुलकर्णी आगामी आयपीएल हंगामासाठी बुमराहचा सर्वोत्तम रिप्लेसमेंट ठरू शकतो. भारतीय संघासाठी धवल कुलकर्णीने 12 वनडे आणि 2 टी-20 सामने खेळले आहेत.
वरुण ऍरॉन
झारखंडचा वेगवान गोलंदाज वरुण ऍरॉन (Varun Aaron) देखील मुंबई संघात बुमराहची जागा घेऊ शकतो. एकेकाळी आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये स्वतःची गुणवत्ता सिद्ध करून बसला आहे. पण मागच्या मोठ्या काळापासून अरोन अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाहीये. असे असले तरी मुंबई इंडियन्स आगामी हंगामासाठी या 33 वर्षीये वेगवान गोलंदाजाला संघात सामील करू शकते. वरुण ऍरॉन त्याची गती आणि स्विंगसाठी ओळखला जातो.
मागच्या आयपीएल हंगामात गुजरात टायटन्स संघात सामील असलेल्या वरुण ऍरॉनकडे आगामी हंगामासाठी कॉन्ट्रॅक्ट आहे. 52 आयपीएल सामन्यांमध्ये ऍरॉनने 44 विकेट्स घेतल्या आहेत. गुजरात टायटन्स संघाव्यतिरिक्त दिल्ली कॅपिटल्स, रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, किंग्ज इलेव्हन पंजाब आणि राजस्थान रॉयल्स संघासाठी खेळला आहे. त्याने 2011 ते 2015 दरम्यान भारतासाठी 9 कसोटी आणि 9 वनडे सामने खेळले आहेत.
अनिकेत चौधरी
जसप्रीत बुमराहची जागा घेण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाकडे तिसरा सर्वोत्तम पर्याय अनिकेत चौधरी (Aniket Choudhary) आहे. राजस्थान संघाकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या अनिकेत चौधरीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत जबरदस्त प्रदर्शन केले. त्याने 5 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. हे प्रदर्शन टी-20 फॉरमॅटमध्ये केले असल्यामुळे मुंबई इंडियन्ससाठी अनिकेत चांगला पर्याय ठरू शकतो. अनिकेत चौधरीला आयपएलमध्ये खेळण्याचा जास्त अनुभव नाहीये. 2017 मध्ये त्याने बेंगलोर संघासाठी पाच सामने खेळले, ज्यात 5 विकेट्स नावावर केल्या. देशांतर्गत क्रिकेटमध्ये अनिकेत चौधरीने 39 टी-20 सामने खेळले आहेत आणि यात 47 विकेट्स घेतल्या.
(Three fast bowlers, who will fill Jasprit Bumrah’s void in IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
आयपीएल नसतानाही पुजाराने एका चेंडूत कसे छापले एक लाख रुपये? वाचा तुम्हीच
फुटबॉल चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! मेस्सी वाटतोय गोल्ड आयफोन, जाणून घ्याच